ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या बच्चन यांचं नातं सर्वश्रुत आहे. अनेकदा ह्या मायलेकी एकत्र स्पॉट होतात. इंडस्ट्रीतील कोणाचाही लग्नसोहळा असो किंवा कोणता पुरस्कार सोहळा असो... सर्वच ठिकाणी या मायलेकी एकत्र स्पॉट झाल्या आहेत. 'कान्स फेस्टिव्हल' वेळी ऐश्वर्याचा हात फ्रॅक्चर होता. त्यावेळी आराध्या ती आपल्या आईची काळजी घेताना दिसली. त्यानंतर आता पुन्हा एकदा आराध्या आपल्या आईची काळजी घेताना स्पॉट झाली. पण यावेळी आराध्या पहिल्यांदाच पापाराझींवर भडकली आहे. नेमकी आराध्या पापाराझींवर का भडकली ? जाणून घेऊया...
ऐश्वर्या आणि आराध्या ह्या दोघीही एअरपोर्टवर एकत्र स्पॉट झाल्या. यावेळी दोघींनीही मॅचिंग आऊटफिट कॅरी केला होता. आराध्या आणि ऐश्वर्या एयरपोर्टवर डॉक्यूमेंट व्हेरिफिकेशन करत होते. यावेळी पापाराझी दोघींनाही कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यासाठी धडपड करत होते. या दरम्यान, एका पापाराझीच्या कॅमेऱ्यातून विचित्र आवाज आल्यामुळे आराध्या घाबरली. कॅमेऱ्याकडे पाहून तिने 'जरा काळजीपूर्वक काम करा' अशी कमेंट केली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
त्याशिवाय आराध्या अनेकदा तिच्या आईची काळजी घेतानाही स्पॉट होते. आराध्याने काही पहिल्यांदाच आईची काळजी घेतलेली नाही. यापूर्वीही ती अनेकदा आईची काळजी घेताना स्पॉट झाली आहे. एअरपोर्टवर चेक ईन झाल्यावर आणि डॉक्यूमेंट व्हेरिफाईड झाल्यानंतर दोघींनीही कॅमेऱ्यासमोर एक क्यूट स्माईल दिली. आराध्या आपल्या आईसोबत एअरपोर्टवर जाताना पापाराझींना बाय बाय करुन पुढे गेली. सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.
या व्हायरल व्हिडिओमुळे, आराध्याला काही युजर्स ट्रोल करीत आहेत. 'ही तर जया बच्चन प्रमाणेच वागायला लागली', 'आजी जयासारखीच का वागते ही ?', 'आजीचे गुण नको, आईचे गुण घे', 'अभिषेक बच्चन कुठे ?', 'जेव्हा बघू तेव्हा फिरतेस, अभ्यास केव्हा करतेस तू', 'इतक्या लहान वयात इतका ॲटिट्यूड बरा नव्हे' अशा अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी व्हिडिओवर केलेल्या आहेत. सध्या आराध्या सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.