Aishwarya Rai And Aaradhya Bachchan : आराध्या आईसोबत जगभर फिरते, मग शाळेत केव्हा जाते ? ट्रोलर्सच्या प्रश्नावर ऐश्वर्या रायचं खणखणीत उत्तर

Aishwarya Rai And Aaradhya Bachchan News : नेटकऱ्यांनी आराध्याला "तु नेहमीच आई- वडिलांसोबत परदेशात फिरत असते, मग आराध्या शाळेत केव्हा जाते ?" असा प्रश्न विचारला. या प्रश्नावर आता ऐश्वर्याने उत्तर दिले आहे.
Aishwarya Rai And Aaradhya Bachchan :  आराध्या आईसोबत जगभर फिरते, मग शाळेत केव्हा जाते ? ट्रोलर्सच्या प्रश्नावर ऐश्वर्या रायचं खणखणीत उत्तर
Aishwarya Rai Travel Around World With Daughter Aaradhya BachchanSaam Tv

कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२४ मध्ये बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चननेही उपस्थिती लावली होती, यावेळी तिच्यासोबत तिची लेक आराध्याही होती. यावेळी आईच्या हाताला लागल्यामुळे लेक आराध्याने आईची विशेष काळजी घेतली, यामुळे तिचे नेटकऱ्यांनी कौतुकही केलं. ऐश्वर्या आणि आराध्या अनेकदा एकत्र स्पॉट झाले आहेत. या दोघीही अनेकदा एकत्र स्पॉटही झाल्या आहेत. आराध्या सध्या शालेय शिक्षण घेत आहे. नेटकऱ्यांनी आराध्याला "तु नेहमीच आई- वडिलांसोबत परदेशात फिरत असते, मग आराध्या शाळेत केव्हा जाते ?" असा प्रश्न विचारला.

नेटकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर खुद्द ऐश्वर्यानेच दिलेलं आहे. सध्या तिचा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ती मुलाखतीत म्हणाली की, "आराध्याच्या शाळेला सुट्टी होऊन आम्ही केव्हाच बाहेर जाण्याचा प्लॅन करीत नाही. तिच्या शाळेला एकही खाडा होऊ न देता आम्ही बाहेर जाण्याचा प्लॅन करतो. जर तुम्ही आमचे ट्रीप प्लॅन पाहिले तर आम्ही नेहमीच विकेंडला फिरायला जातो."

"मला असं वाटतं की, मी एक बेस्ट फ्लाईट मॅनेजर आहे. मला कोणीही, कधीही आणि केव्हाही विमानाचा वेळ विचारला तरीही अगदी बरोबर सांगू शकते. ट्रॅव्हलिंगची वेळ व्यवस्थित मॅनेज व्हावी, यासाठी मी वेळेचं व्यवस्थापन करते. ज्यावेळी तिच्या शाळेला सुट्टी असते त्याचवेळी आम्ही फिरायला जातो. सोमवारी आराध्याच्या शाळेचा खाडा होणार नाही याची मी काळजी घेते." ऐश्वर्या राय एक प्रसिद्ध अभिनेत्री तर आहेच,पण ती एक 'सर्वोत्कृष्ट आई'ही आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com