बॉलिवूड अभिनेता इम्रान हाश्मी त्याच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आला आहे. ऐश्वर्या राय-बच्चनच्या संदर्भात त्याने एक वक्तव्य केलं आहे. 'द लॅलनटॉप'ला दिलेल्या मुलाखतीत, इम्रानने वादग्रस्त टिप्पणी केली आहे. नेमकं मुलाखतीदरम्यान त्याने काय म्हटले आहे ? ऐश्वर्या राय-बच्चनची त्याला नेमकी का माफी मागायची आहे ? ऐश्वर्या आणि इम्रानचा 'तो' किस्सा नेमका काय आहे ? जाणून घ्या...
बॉलिवूड अभिनेता इम्रान हाश्मी सध्या त्याच्या 'शो टाइम' या वेब सीरिजमुळे चर्चेत आला आहे. 12 जुलैला इम्रानची ही वेब सीरिज 'हॉटस्टार'वर प्रदर्शित झाली आहे. यासाठी विविध ठिकाणी प्रमोशन आणि मुलाखती इम्रान सध्या देत आहे. यांसदर्भात प्रमोशन करत असताना त्याने 'द लॅलनटॉप'ला एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीदरम्यान त्याच्या आजवरच्या प्रवासावर प्रदीर्घ चर्चा झाली आहे. त्याच्या आयुष्यातील चढ-उतार, सिनेसृष्टीतील पदार्पण आणि त्याने साकारलेल्या भूमिका याविषयी इम्रानने भाष्य केले आहे.
याच मुलाखतीमध्ये ऐश्वर्या राय-बच्चनची माफी मागायची आहे असं म्हटले. काही वर्षांपूर्वी करण जोहरच्या "कॉफी विथ करण'' या चॅटशोवर इम्रान सहभागी झाला होता. या शोमध्ये रॅपिड-फायर राउंड दरम्यान, इम्रान हाश्मीने ऐश्वर्या राय बच्चनला "प्लास्टिक" असे संबोधले होते. त्याच्या या वक्तव्यानंतर बॉलिवूडसह प्रेक्षकांमधूनसुद्धा विविध प्रतिक्रिया उमटल्या.
इम्रानने केलेली टिपण्णी कितपत योग्य होती याविषयी तर्क-वितर्क लढवले गेले. 2014 मधील त्याच्या टिप्पणीवर प्रचंड प्रतिक्रिया उमटल्या. त्यानंतर इम्रानला त्याचे परिणामही भोगावे लागले. त्या किस्स्यानंतर नेमकं काय काय घडले ? कोणत्या परिणामांना त्याला सामोरे जावे लागले ? याविषयी इम्रानने मुलाखतीत भाष्य केले आहे.
या संभाषणादरम्यान इम्रानला विचारले गेले की, ''त्याला ऐश्वर्याला “प्लास्टिक” म्हणण्याचा पश्चात्ताप आहे का?'' यावर इम्रान म्हणाला, ''मला खेद वाटतो. मी ज्यांच्याबद्दल बोललो त्या प्रत्येकाचा मला अत्यंत आदर आहे. मला खेद वाटतो कारण ते अप्रिय होते. अलीकडे लोक खूप संवेदनशील झाले आहेत. सोशल मीडियावरील प्रत्येक गोष्टीवर लोक वेडे होतात. त्या शोबद्दल बोलायचे झाले तर, आम्ही एक खेळ खेळत होतो. हे सर्व चेष्टेत बोलणे सुरु होते. ते खेळात घ्यायला हवे होते. मला त्या वक्तव्याचा पश्चाताप होतोय, कारण ते अपमानजनक असू शकते. शोमध्ये असे अनेक खेळ आहेत. पूर्वी लोक इतके संवेदनशील नव्हते.''
तो पुढे म्हणाला, "तिला वाईट वाटले असेल तर मला माफी मागायला आवडेल.". त्याच्या या वक्तव्यानंतर इतक्या वर्षांनी अद्याप ऐश्वर्या राय-बच्चनकडून कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. इम्राने 2014 मध्ये "कॉफी विथ करण'' च्या सीझनमध्ये हे वक्तव्य केले होते. त्यानंतर 2019 मध्ये फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीमध्ये ऐश्वर्या याविषयी बोलली होती. 'मी फेक आणि प्लास्टिक असल्याचं म्हटलं गेले, ते अत्यंत वाईट आहे." असं तेव्हा ऐश्वर्या म्हणली होती. एवढंच नव्हे तर, या वक्तव्यामुळेच ऐश्वर्याने इम्रानसह काम करण्यास नाकारलं, अशा चर्चाही रंगल्या होत्या.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.