Aamir Khan Marriage : आमिरच्या लग्नाची तारीख ठरली, तिसऱ्यांदा अडकणार लग्नबंधनात?

Aamir Khan, Gauri Spratt : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा लग्नबंधनात अडकणार का? गौरी स्प्रॅटसोबतच्या नात्याची चर्चा रंगली असून लग्नाच्या अफवांनी सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. जाणून घ्या संपूर्ण माहिती.
Aamir Khan
Aamir KhanSaam
Published On

यामिनी महामुनकर

Aamir Khan third marriage news : लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात असं म्हणतात, पण बॉलिवूडच्या या सुपरस्टारने मात्र प्रेमाची व्याख्याच बदलून टाकली आहे. एक दोन नव्हे तर मिस्टर परफेक्शनिस्ट आता तिसऱ्यांदा लग्नबंधनात अडकणार आहे....आमिरची मिसेस परफेक्शनिस्ट कोण आहे? सिनेविश्वात काय चर्चा रंगलीय... पाहूयात...

बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्शनिस्ट' पुन्हा एकदा लग्न करणार आहे.. तुम्ही ऐकताय ते अगदी खरंय.. सध्या सोशल मीडिया आणि बी-टाऊनमध्ये एकच चर्चा रंगलीय, ती म्हणजे आमिर खानच्या तिसऱ्या लग्नाची..

वयाची साठी उलटल्यानंतरही आमिरच्या आयुष्यात पुन्हा एकदा प्रेमाची नवी इनिंग सुरू होणार आहे. आमिर त्याची नव्या मिसेस परफेक्शनिस्टबरोबर लवकर लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे... मात्र यापूर्वी आमिरनं दोनदा लग्नगाठ बांधली होती.

Aamir Khan
Maharashtra politics : पुणे, कोकणसह विधान परिषद निवडणूक बिनविरोध, सत्ताधाऱ्यांचा मविआला जोरदार झटका; पाहा कुठे काय झालं?

पहिलं लग्न 1986 ला रीना दत्ता सोबत केलं, लग्नाच्या 16 वर्षांनी म्हणजेच 2002 साली दोघांनी वेगळं व्हायचा निर्णय घेतला..

त्यानंतर लगेचच आमिरच्या आयुष्यात किरण राव आली. आणि 3 वर्षात म्हणजेच 2005 साली दोघं लग्नबंधनात अडकली आणि त्यांचाही 2021 साली घटस्फोट झाला.

किरण रावसोबत घटस्फोट झाल्यानंतरही आमिरचे तिच्यासोबतचे व्यावसायिक आणि कौटुंबिक संबंध अतिशय सलोख्याचे राहिलेत. आणि आता त्याच्या आयुष्यात येणारी 'ती'

Aamir Khan
राणेंनी कोकणात डाव टाकला! उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का; शेवटच्या तासात बाळ मानेंची माघार

कोण आहे 'मिसेस परफेक्शनिस्ट'?

गेल्या वर्षी आमिरने स्वतःच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त गौरीची माध्यमांशी ओळख करून दिली होती.

गौरी आणि आमिरची भेट एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून झाली.. गौरी स्प्रैट ही मूळची बंगळुरूची राहणारी असून ती ब्युटी इंडस्ट्रीशी जोडलेली आहे. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे ब्रिटिश वंशाचे कम्युनिस्ट नेते फिलिप स्प्रैट यांची ती नात आहे.

रीना दत्ता आणि किरण राव यांच्यानंतर आता 'गौरी स्प्रैट'. प्रत्येक सिनेमात परफेक्शन देणाऱ्या आमिरची आता गौरीसोबत साठीतली ही इनिंगही परफेक्ट ठरणार का हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.

Aamir Khan
MLC Election : ठाण्यात शिंदेंच्याच शिवसेनेचा विजय निश्चित, एक फोन अन् पवारांची अचानक माघार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com