Aai Kuthe Kay Karte Daily Episode: अरुंधती नसताना देशमुखांच्या घरावर कोसळलं मोठं संकट; यशचा अडकला मोठ्या संकटात?

Aai Kuthe Kay Karte Latest Episode: ईशा केळकरांच्या घरी रडत रडत जाते. म्हणते, यश काल रात्रीपासून घराबाहेर आहे. अजूनही तो घरी आलेला नाही.
Aai Kuthe Kay Karte Latest Episode
Aai Kuthe Kay Karte Latest Episode Saam Tv

Aai Kuthe Kay Karte Latest Promo: ‘आई कुठे काय करते’ मालिका सध्या आईविनाच अर्थात अरूंधती विनाच सुरू आहे. एका बाजुला अरूंधतीच्या नसण्याने घरात सर्वच काही काळ भावूक आहेत. तर दुसऱ्या बाजुला देशमुखांच्या घरात ईशा आणि अनिशवरुन भांडण होतं. ते दोघेही चित्रपट पाहायला गेल्याने कांचनताईंनी दोघांचीही चांगलीच कानउघडणी केली. यावेळी ईशाने तुम्ही सारखं सारखं मलाच का बोलता यश- गौरीला का नाही बोलत? असा प्रश्न विचारते. तुमच्या दोघांच्याही भांडणात मला आणू नका असं म्हणत यश त्या दोघींवर चिडून बाहेर जातो.

Aai Kuthe Kay Karte Latest Episode
Rocky Aur Raani Ki Prem Kahaniचा First Look रिलीज, रणवीर- आलियाला पाहून लोक म्हणाले...

त्यानंतर अनिशही यशला समजवण्याचा प्रयत्न करतो, पण तो त्याचं बोलणं ही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. यशला गौरी सोडून गेल्यामुळे सर्वच त्याला सहानूभुती देण्याचा प्रयत्न करताय, असं त्याला वाटतं. तुला आणि ईशाला एकमेकांशिवाय दुसरं कोणीही दिसत नाही, असं तो अनिशला यश सुनावतो. यश अनिशला बोलण्यामध्ये इतक्यावरच थांबत नाही, तो म्हणतो, 'अनिश, मला आता असं वाटायला लागलंय की, आपल्यात मैत्री होती की नाही, तू फक्त ईशासाठी मैत्री केलीस असं वाटतंय. साखरपुडा झाला, काम झालं आणि माझं महत्त्व संपलं.' असं म्हणत यशने अनिशला त्यांच्या मैत्रीवरूनही सुनवलं. (Entertainment News)

कालच्या एपिसोडमध्ये, वीणाने आशुतोष आणि नितीनसोबत अनिरूद्धची बाजू घेऊन ती भांडताना दिसली. अनिरूद्धने तिच्या परस्पर कंपनीत फेरफार बदल केल्यानंतर त्यांच्यातील मैत्री दिवसेंदिवस घट्ट होत आहे. ती म्हणते, तो पार्टनर आहे माझा, त्याचं म्हणणं बरोबर आहे. इतक्या जणांचे इनपूट घेतल्यास गोंधळ वाढणारच ना', असं म्हणत तिने आशुतोष- नितीनच्या समोर अनिरूद्धची बाजू घेतली. तो खूप मेहनती देखील आहे, आणि मला तो माझ्या कामातही खूप मदत करतो, असंही ती यावेळी म्हणाली. 'मी त्याला तुमच्या अनुभवावरुन का त्याला जज करू?' असा सवाल वीणाने यावेळी दोघांनाही विचारला. (Marathi Film)

Aai Kuthe Kay Karte Latest Episode
जबरदस्त ॲक्शन, रफ-अँड-टफ सीन्स; शाहिदचा भारावून टाकणारा ‘Bloody Daddy’चा Trailer Out

अनिरूद्धने तिला सांगितलं की, त्याचं अरूंधतीवर खूप प्रेम असून सर्वच तिची बाजू घेतात, तिचा विचार करतात. असं वीणा म्हणत तिने अनिरूद्धची बाजू घेतली. याच दरम्याान वीणाला चक्कर येते. वीणा म्हणते, मायग्रेनचा त्रास असल्यामुळे मला चक्कर आली. वीणाला चक्कर आल्यामुळे लगेचच सुलेखा ताईंनी तिला काळजीपायी शिरा भरवतात. आणि तिला म्हणतात, तुला बरं न वाटेपर्यंत तू घरीच राहा. मग ती त्यांच्याच घरी राहते. (Marathi Serial)

पुढे अनिरूद्धने वीणाला न कळता केलेला कारनामा, तो संजनाला सांगतो, यावेळी त्याने मोठ्या आनंदाने वीणाच्या कंपनीत पन्नास टक्के भागीदार झाल्याचे संजनाला सांगितलं. सध्या अनिरूद्ध वीणाला तिच्या भावाविरोधात अर्थात आशुतोष विरोधात भडकवण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या या कृत्यापायी संजनाला अनिरूद्धचा राग येतो. नेहमीप्रमाणे संजना त्याला समजवण्याचा प्रयत्न करते, पण तिच्या बोलण्याकडे त्याने दुर्लक्ष केले.

Aai Kuthe Kay Karte Latest Episode
जबरदस्त ॲक्शन, रफ-अँड-टफ सीन्स; शाहिदचा भारावून टाकणारा ‘Bloody Daddy’चा Trailer Out

मालिकेच्या पुढच्या भागात, अनिरूद्ध केळकरांच्या घरी असून, ईशा केळकरांच्या घरी रडत रडत जाते. यश काल रात्रीपासून घराबाहेर आहे, अजूनही तो घरी आलेला नाही. तेवढ्यात यश सोबत संपर्क होतो आणि कळतं की, त्याचा अपघात झाला. संजनाही देशमुखांच्या घरामध्ये ही बातमी देते तेव्हा सर्वांच्या पायाखालची जमीन सरकते. (Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com