जबरदस्त ॲक्शन, रफ-अँड-टफ सीन्स; शाहिदचा भारावून टाकणारा ‘Bloody Daddy’चा Trailer Out

Shahid Kapoor OTT Film: शाहिद लवकरच ‘ब्लडी डॅडी’ या चित्रपटाच्या माध्यमातून तो ओटीटीवर प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज होत आहे.
Shahid Kapoor Film Bloody Daddy Trailer Out
Shahid Kapoor Film Bloody Daddy Trailer OutSaam Tv

Bloody Daddy Trailer Out: नुकताच ‘फर्जी’ वेब सीरिजमुळे सर्वाधिक चर्चेत राहिलेला शाहिद कपूर सध्या कमालीचा चर्चेत आहे. शाहिदने त्या वेब सीरिजच्या माध्यमातून ओटीटी क्षेत्रात पदार्पण करत आपल्या अभिनयाची चुणूक पुन्हा एकदा सर्वांना लावली. अशातच पुन्हा एकदा तो एका नवीन कलाकृतीमुळे चर्चेत आला आहे. शाहिद लवकरच ‘ब्लडी डॅडी’ या चित्रपटाच्या माध्यमातून तो ओटीटीवर प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज होत आहे.

Shahid Kapoor Film Bloody Daddy Trailer Out
Asur 2 First Look: नेमका हा ‘असुर’ कोण? अर्शद वारसी आणि बरुण सोबतीच्या ‘असुर २’चा फर्स्ट लूक प्रदर्शित, होणार ‘या’ दिवशी प्रदर्शित

गेल्या काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचा पहिला पोस्टर प्रदर्शित झाला होता, खरं तर तेव्हा पासूनच चित्रपटाची सर्वांना उत्सुकता लागली आहे. त्यानंतर आता चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित करण्यात आला आहे. ट्रेलर पाहिल्यानंतर चाहत्यांची उत्सुकता आणखीनच वाढली असून सर्वच चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

शाहिदने चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्या पोस्टवर चाहत्यांनी लाईक्स करत कमेंट केली आहे. शाहिदने ट्रेलर शेअर करताना कमेंट केली की, ‘ अ हेल ऑफ अ ब्लडी नाईट.... ट्रेलर आऊट #BloodyDaddyOnJioCinema’ असं कॅप्शन देत त्याने पोस्ट शेअर केली आहे. भरपूर धमाका आणि जबरदस्त ॲक्शन असलेला या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Shahid Kapoor Film Bloody Daddy Trailer Out
Famous Producer Dies : प्रसिद्ध निर्मात्याचा संशयास्पद मृत्यू; हॉटेलचे दार उघडताच दिसलं भयंकर दृश्य

प्रदर्शित झालेला ट्रेलर पाहिल्यानंतर, हा सगळा खेळ एका कोकेनने भरलेल्या बॅगसाठी खेळला जात आहे. हा चित्रपट पुर्णपणे ॲक्शन सीन्सने भरलेला आहे. यात शाहिद कपूर एका भयानक आणि रफ-अँड-टफ भूमिकेत दिसत आहे. त्याचबरोबर संजय कपूर आणि रोनित रॉय यांच्या भुमिकाही खुपच प्रभावित करणाऱ्या आहेत.

Shahid Kapoor Film Bloody Daddy Trailer Out
Munawwar Rana Hospitalize: मुनव्वर राणा यांची प्रकृती खालावली, रूग्णालयात उपचार सुरू...

जबरदस्त ॲक्शन असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अली अब्बास जफर यांनी केले आहे. शाहिद कपूर, संजय कपूर आणि रोनित रॉय यांच्या सोबतच चित्रपटात डायना पेंटी आणि राजीव खंडेलवाल यांच्याही भूमिका आहेत. या कलाकारांनी चित्रपटात उत्तम भूमिका साकारली आहे. हा चित्रपट ‘जिओ सिनेमा’ वर ९ जून २०२३ ला प्रदर्शित होणार असून ट्रेलर सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com