Rocky Aur Raani Ki Prem Kahaniचा First Look रिलीज, रणवीर- आलियाला पाहून लोक म्हणाले...

Rocky Aur Rani Ki Prem Kahani First Look Out: ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चा आज निर्मात्यांनी चित्रपटाचा पहिला लूक शेअर केला आहे.
Rocky Aur Raani Ki Prem Kahani First Look
Rocky Aur Raani Ki Prem Kahani First Look Instagram

Ranveer Singh, Alia Bhatt Upcoming Movie: बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरचा आज वाढदिवस. नेहमीच काही तरी वेगळ्या चित्रपटांच्या शोधात राहिलेल्या करणने आज त्याच्या वाढदिवशी त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चा आज निर्मात्यांनी चित्रपटाचा पहिला लूक शेअर केला आहे. यामध्ये आलिया भट्ट आणि रणबीर कपूर दिसत असून यांची क्यूट लव्हस्टोरी प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.

Rocky Aur Raani Ki Prem Kahani First Look
Rocky Aur Raani Ki Prem Kahaniचा First Look रिलीज, रणवीर- आलियाला पाहून लोक म्हणाले...

'कुछ कुछ होता है', 'कभी अलविदा ना कहना', 'ए दिल है मुश्किल', 'माय नेम इज खान' यांसारखे अनेक उत्कृष्ट चित्रपटाच्या निर्मात्याचा आज वाढदिवस आहे. सोबतच त्याच्या सिनेकारकिर्दिला २५ वर्ष पूर्ण झाली आहेत. आज चित्रपटाच्या निर्मात्यांसह सेलिब्रिटींनीही त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर चित्रपटाचे पोस्टर शेअर केले. हा एक फॅमिली ड्रामा चित्रपट असून चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच हसवून हसवून रडवेल अशी निर्मात्यांची प्रतिक्रिया आहे.

रणवीर सिंग आणि आलिया भट्टच्या लूकबद्दल बोलायचे तर, रणवीर ‘रॉकी’च्या भूमिकेत आहे तर आलिया ‘राणी’च्या भूमिकेत आहे. सध्या रणवीरच्या लूकची बरीच चर्चा सुरू असून पोस्टवर अनेक चाहत्यांनी कमेंटही केल्या. नेहमीप्रमाणे काहींनी चित्रपटाचे कौतुक केले आहे तर, काहींनी त्याला ट्रोल देखील केले आहे. सोबतच अनेकांनी चित्रपटाची कथा काय आहे, याचा अंदाजही लावला. गेल्या काही दिवसांपुर्वी सोशल मीडियावर चित्रिकरणादरम्यानचे काही फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल झाले.

Rocky Aur Raani Ki Prem Kahani First Look
Asur 2 First Look: नेमका हा ‘असुर’ कोण? अर्शद वारसी आणि बरुण सोबतीच्या ‘असुर २’चा फर्स्ट लूक प्रदर्शित, होणार ‘या’ दिवशी प्रदर्शित

करणने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर दोन पोस्ट शेअर केल्या आहेत. एकामध्ये आलिया भट्टचा लूक तर दुसऱ्यामध्ये रणवीर सिंग त्याच्याच स्टाईलमध्ये दिसत आहे. तर तिसऱ्या पोस्टरमध्ये दोघे एकत्र दिसत आहेत. या रॉकिंग पोस्टरवर अल्पावधीतच लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव पडलाय.आज करण जोहरच्या वाढदिवसानिमित्ताने 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चं हटके पोस्टर लॉंच झालंय.

'रॉकी आणि रानी की प्रेम कहानी' बद्दल बोलायचे झाले तर, हा चित्रपट 28 जुलै 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. ज्यामध्ये रणवीर सिंग आणि आलिया भट्ट व्यतिरिक्त शबाना आझमी, धर्मेंद्र आणि जया बच्चन सारखे स्टार्स देखील दिसणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com