Miss World 2025 Winner : थायलंडच्या सुंदरीने जिंकला 'मिस वर्ल्ड 2025'चा किताब, पाहा PHOTOS

Opal Suchata : '72 व्या मिस वर्ल्ड 2025' ग्रँड फिनाले नुकताच पार पडला आहे. 'मिस वर्ल्ड 2025' ची विजेता थायलंडची ओपल सुचता झाली आहे. टॉप ४ मध्ये कोण आले, जाणून घेऊयात.
Opal Suchata
Miss World 2025 WinnerSAAM TV
Published On

72 व्या मिस वर्ल्ड स्पर्धेचा (72nd Miss World 2025 ) ग्रँड फिनाले नुकताच पार पडला आहे. भारतात झालेल्या 72 व्या मिस वर्ल्ड स्पर्धेचा ग्रँड फिनाले शनिवारी हैदराबाद येथे पार पडला. या ग्रँड फिनालेची चाहते उत्सुकतेने वाट पाहत होते. थायलंडमधील एका सुंदरीने हा मिस वर्ल्ड स्पर्धेचा मुकुट जिंकला आहे.

नुकतीच 'मिस वर्ल्ड 2025' च्या विजेत्याची घोषणा करण्यात आली आहे. थायलंडच्या ओपल सुचाता हिला (Opal Suchata ) 'मिस वर्ल्ड 2025' चा मुकुट देण्यात आला आहे. '72 व्या मिस वर्ल्ड 2025' चा ग्रँड फिनाले काल संध्याकाळी 6.30 च्या सुमारास तेलंगणाच्या हैदराबाद येथे सुरू झाला. मिस वर्ल्ड स्पर्धेचा अंतिम सामना 108 स्पर्धकांच्या परिचयाने सुरू झाला.

थायलंडच्या ओपल सुचाताचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फोटोंमध्ये तिने व्हाइट रंगाचा सुंदर गाऊन परिधान केलेला दिसत आहे. तिच्या डोक्यावर 'मिस वर्ल्ड 2025' चा मुकुट सजलेला पाहायला मिळत आहे. सध्या ओपल सुचातावर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

नंदिनी गुप्ता

नंदिनी गुप्ता भारताचे प्रतिनिधित्व करत होती. '72 व्या मिस वर्ल्ड 2025'मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नंदिनी गुप्ता टॉप 8 मध्ये स्थान मिळवू शकली नाही. चाहत्यांना भारताच्या नंदिनी गुप्ताच्या विजयाची उत्सुकता लागली होती. नंदिनी गुप्ता भारताचे प्रतिनिधित्व करत होती. मात्र तिचे हे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही.

इतर विजेते

'मिस वर्ल्ड 2025' ची विजेता ओपल सुचाता झाली. या स्पर्धेत दुसरे स्थान मिस इथियोपिया, तिसरे स्थान मिस पोलोनिया आणि चौथे स्थान मिस मार्टिनिक यांनी पटकवले आहे.

Opal Suchata
"यादें मिठाई के डिब्बे की तरह होती है..."; YJHD चित्रपटाला १२ वर्षे पूर्ण, वाचा 'नैना'चे ४ फेमस डायलॉग

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com