पाय पकडले, विनवण्या केल्या, पण मला ओढत रुममध्ये नेलं अन्...; कोलकाता सामूहिक अत्याचार प्रकरणातील पीडीतेची आपबीती
कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या एका तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याची एक भयानक घटना समोर आली आहे. पोलिसांनी या घटनेमध्ये सहभागी असलेल्या कॉलेजमध्ये शिकत असलेल्या दोन विद्यार्थ्यांसह आणि एका माजी विद्यार्थ्यासह तीन जणांना अटक केली आहे. ही घटना २५ जून रोजी संध्याकाळी ७.३० ते १०.५० दरम्यान घडल्याचं सांगितलं जात आहे.
पीडितेच्या तक्रारीवरून दाखल करण्यात आलेल्या एफआयआरनुसार, या प्रकरणातील मुख्य आरोपी मोनोजित मिश्रा आहे. तो महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी आहे आणि तृणमूल काँग्रेस छात्र परिषद (टीएमसीपी) युनिटचा अध्यक्ष राहिला आहे. याशिवाय, आणखी दोन आरोपी जैब अहमद आणि प्रमित मुखर्जी यांचीही एफआयआरमध्ये नावे आहेत.
मुख्य आरोपीने तिच्यावर लग्न करण्यासाठी दबाव आणला
पीडितेनं तक्रारीत म्हटलं आहे की, मुख्य आरोपी मोनोजित मिश्राने तिला लग्न करण्यास भाग पाडलं. जेव्हा पीडितेने त्याला सांगितलं की तिचा बॉयफ्रेंड आहे, तेव्हा आरोपीने तिला मारण्याची आणि तिच्या कुटुंबीयांना खोट्या प्रकरणांमध्ये अडकवण्याची धमकी दिली. आरोपीने पीडितेच्या बॉयफ्रेंडला कॉलेजमध्ये डांबून ठेवलं आणि मारहाण केली.
पीडितेनं सांगितली आपबीती
पीडितेने दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, आरोपीने मला त्याच्यासोबत लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला. मी नकार दिला आणि त्याला मागे ढकललं. मी रडत त्यांना मला जाऊ देण्यास सांगितलं. मी त्यांना सांगितलं की माझा एक बॉयफ्रेंड आहे आणि मी त्याच्यावर खूप प्रेम करते, पण त्यांनी माझं ऐकलं नाही. पीडितेने पुढे सांगितलं की, मी त्यांचे पाय धरून सांगितलं की मला जाऊ द्या, पण त्यांने ऐकलं नाही. माझा जीव गुदमरायला लागला आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. मी त्यांना मला रुग्णालयात नेण्यास सांगितलं, पण त्यांनी माझं ऐकलं नाही. त्यांनी मला जबरदस्तीने गार्ड रूममध्ये नेलं आणि माझ्यावर सामूहिक बलात्कार केला.
आरोपीने पीडितेला कायदेशीर कारवाईसाठी धमकी दिली
पीडितेने तिच्या तक्रारीत म्हटलं आहे की, आरोपीने संपूर्ण घटनेचा व्हिडिओ रेकॉर्डही केला. त्याने मला धमकी दिली की जर मी बाहेर गेल्यानंतर काही केलं तर तो हा व्हिडिओ सर्वांना दाखवेल. मी खोलीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असताना त्यांनी मला हॉकी स्टिकने मारण्याचा प्रयत्न केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.