लातूर: सेवानिवृत्त शिक्षकाच्या घरात चाेरट्यांचा डल्ला, सोन्या चांदीच्या दागिन्यासह 13 लाख 75 हजार रुपयांचा ऐवज लंपास

valuables worth rs 13 lakhs robbed from house in udgir near latur: दरम्यान चोरी करण्यासाठी घरात प्रवेश करतानाचा चाेरट्यांचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
valuables worth rs 13 lakhs robbed from house in udgir near latur
valuables worth rs 13 lakhs robbed from house in udgir near laturSaam Digital

- संदीप भाेसले

लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरात मध्यरात्री झालेल्या चाेरीत चाेरट्यांनी सोन्या चांदीच्या दागिन्यासह 13 लाख 75 हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची माहिती समाेर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या घटनेचा तपास पोलिस करीत आहेत.

उदगीर शहरातील तुलसीधाम सोसायटी परिसरात मध्यरात्री तीन चोरट्यांनी घरफाेडी केली. हा प्रकार पहाटेच्या सुमारास घडला. सेवानिवृत्त शिक्षक रामेश्वर राचप्पा धाडे हे त्यांच्या मुलाला भेटण्यासाठी परगावी गेले होते. त्याचा फायदा घेत धाडेंच्या घरात चोरट्यांनी प्रवेश केला.

valuables worth rs 13 lakhs robbed from house in udgir near latur
डाॅक्टरच्या अटकेसाठी आयएमए संघटना सरसावली, पाेलिस ठाण्यात ठिय्या आंदाेलन; नेमकं काय घडलं सांगाेल्यात?

धाडेंच्या घरातून सोने-चांदीसह 13 लाख 75 हजार रुपयांचा ऐवज चाेरीस गेल्याची नाेंद पाेलिसांत झाली आहे. उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी पुढील तपास करत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

valuables worth rs 13 lakhs robbed from house in udgir near latur
Tuljapur : 'त्या' प्रकरणात गुन्हे दाखल करा, तुळजापुरात हिंदू जनजागृती समितीचे घंटानाद आंदोलन

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com