theft case in janki ramnagar dhule
theft case in janki ramnagar dhule Saam TV

Dhule Crime News : जानकी रामनगर परिसरात धाडसी चाेरी, साेने, चांदीसह लाखाेंची रक्कम पळवली; आझाद नगर पाेलिसांचा तपास सुरु

Dhule Latest Marathi News : प्रफुल्ल जैन यांचे फुलवाला चौकात बॅग विक्रीचे दुकान आहे. त्यांचे कुटुंबीय झोपी गेले असता चोरट्यांनी त्यांच्या घरावर डल्ला मारला.

Dhule :

धुळे (dhule) शहरात रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी एका घरातून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह जवळपास दीड लाख रुपयांची रोकड लांबवली. या प्रकरणी प्रफुल्ल नवनीतलाल जैन यांनी पाेलिसांत तक्रार नाेंदवली. या चाेरीचा आझाद नगर पोलिस तपास करीत आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

धुळे शहरातील जानकी रामनगर येथे रात्री चोरट्यांनी घराच्या मागील दरवाजा तोडून आत प्रवेश करत सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह जवळपास एक ते दीड लाख रुपयांच्या रोकड वर देखील डल्ला मारला आहे. कुटुंबीयांना या चोरीचा सर्व प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ आझाद नगर पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती दिली.

theft case in janki ramnagar dhule
Vitthal Rukmini Darshan: विठ्ठल रूक्मिणीचे पदस्पर्श दर्शन शुक्रवारपासून राहणार बंद, जाणून घ्या कारण

या घटनेची माहिती मिळताच आझाद नगर पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. प्रफुल्ल नवनीतलाल जैन यांनी घटनेची माहिती पाेलिसांना दिली. आझाद नगर पोलीस या चोरीचा तपास करीत आहेत. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

theft case in janki ramnagar dhule
Success Story : द्राक्षच्या पंढरीत तैवान पेरुची लागवड, अल्पावधीत शेतक-याने कमावले 8 लाख

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com