Crime: ९ महिन्यांच्या गरोदर महिलेची हत्या, पोटातील बाळाचाही मृत्यू; सोलापूर हादरले

Solapur Crime: सोलापूरमध्ये ९ महिन्याच्या गरोदर महिलेची हत्या करण्यात आली. दुसऱ्या तरुणासोबत लग्न केल्यामुळे एक्स बॉयफ्रेंडने तिला संपवलं. या घटनेत महिलेच्या पोटातील बाळाचाही मृत्यू झाला. या घटनेमुळे सोलापूर हादरले.
Crime: ९ महिन्यांच्या गरोदर महिलेची हत्या, पोटातील बाळाचाही मृत्यू; सोलापूर हादरले
Solapur Crime Saam Tv
Published On

Summary -

  • सोलापूरमध्ये गरोदर महिलेचा मृत्यू

  • पोटातील बाळाचाही मृत्यू

  • दुसऱ्याशी लग्न केल्याच्या रागातून तरुणानं केलं भयंकर कृत्य

सोलापूरमध्ये ९ महिन्यांच्या गरोदर महिलेची निर्घृण हत्या करण्यात आली. सोलापूर शहरामध्ये रविवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली. लष्कर परिसरातील बालप्पा तालीम परिसरात राहणाऱ्या गरोदर महिलेची भिंतीवर डोकं आपटून आणि गळा दाबून हत्या करण्यात आली. सोनी गणेश रामपुरे असं या महिलेचे नाव होते. बापू सुरेश आरगोळ या तरुणाने सोनीची निर्घृण हत्या केली. या घटनेत महिलेच्या पोटातील बाळाचाही मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे सोलापूरमध्ये खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोनी रामपुरेचे लग्न वर्षापूर्वी झाले होते. तिचे सासर मोदी परिसरात आहे. सोनी आणि आरोपी बापू आरगोळे यांचे प्रेमसंबंध होते. पण त्यांच्या प्रेमसंबधाला कुटुंबीयांनी विरोध केला. बापूच्या भावाने त्याचे लग्न सोनीसोबत लावून देण्यास नकार दिला होता. बापूसोबत लग्न न झाल्याने लक्ष्मी म्हेत्रे यांनी वर्षभरापूर्वी मुलगी सोनीचे लग्न दुसरीकडे लावून दिले होते.

Crime: ९ महिन्यांच्या गरोदर महिलेची हत्या, पोटातील बाळाचाही मृत्यू; सोलापूर हादरले
Crime news: स्मशानात नेऊन महिलेवर लैंगिक अत्याचार, २ तास डांबून ठेवल्यानंतर नराधमांच्या तावडीतून केली सुटका

सोनीचे लग्न दुसरीकडे झाल्याचा राग बापूच्या मनात होता. याच रागाच्या भरात त्याने रविवारी संध्याकाळी सोनची हत्या केली. सोनी बाळंतपणासाठी माहेरी आली होती. रविवारी बापूर सोनीच्या माहेरी आला. त्याने सोनीची आई लक्ष्मी म्हेत्रे यांना धक्काबुक्की केली आणि नंतर ९ महिन्याच्या सोनीचे तिचा गळा आवळून आणि केस धरून भिंतीवर डोके आपटून तिची हत्या केली. या घटनेत सोनीच्या पोटातील बाळाचा देखील मृत्यू झाला आहे. एका गर्भवती महिलेचा आणि तिच्या पोटातील बाळाचा मृत्यू झाल्याने सोलापुरात हळहळ व्यक्त होत आहे.

Crime: ९ महिन्यांच्या गरोदर महिलेची हत्या, पोटातील बाळाचाही मृत्यू; सोलापूर हादरले
Crime: १९ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार, घरी जाताना अपहरण करत फ्लॅटवर नेलं अन्...; पीडितेचा आत्महत्येचा प्रयत्न

पोलिसांनी सांगितले की, लक्ष्मी म्हेत्रे आणि सोनी रामपुरे या मायलेकी रविवारी १९ एप्रिल रोजी सायंकाळी घराच्या बाहेर बसले होते. लक्ष्मी म्हेत्रे यांच्या घरासमोर राहणारा संशयीत आरोपी बापू आरगोळने घरातील साऊंडवर मोठ्याने गाणी लावली होती आणि तो गल्लीतील लहान मुलांसोबत नाचत आणि गोंधळ घालत होता. लक्ष्मी म्हेत्रे यांनी आरोपीस माझी मुलगी ९ महिन्याची गरोदर असून तिला धक्का लागेल तू साऊंड बंद कर असे सांगितले. सोनीचे लग्न त्याच्यासोबत न लावल्याचा राग मनात धरून आरोपीने फिर्यादीला शिवीगाळ करून धक्का देऊन खाली पाडले. त्यानंतर सोनीची त्याने हत्या केली. या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस फरार आरोपीचा शोध घेत आहेत.

Crime: ९ महिन्यांच्या गरोदर महिलेची हत्या, पोटातील बाळाचाही मृत्यू; सोलापूर हादरले
Latur Crime: गॅसवर स्वयंपाक का केला? सासरच्यांकडून सुनेचा छळ; महिलेने दोन चिमुकल्या मुलांसह संपवलं आयुष्य

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com