Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य,धक्कादायक कारण आलं समोर

Satara Crime News: फलटण येथे झालेल्या एका घटनेने स्थानिकांना धक्का बसलाय. १८ वर्षीय अचल लखना पवार हिने गळफास घेऊन आपले जीवन संपवले. फलटण येथील डॉक्टर मृत्यू प्रकरणानंतर ही घटना घडली आहे.
Satara Crime News
Phaltan tragedy: 18-year-old Achal Pawar found dead by suicide, reason shocks locals.Saam Tv
Published On
Summary
  • आचल लखन पवार असे आत्महत्या करणाऱ्या तरुणीचं नाव

  • आचलने राहत्या घरात लोखंडी अँगलला ओढणीने गळफास घेतला.

  • आचल पवार हिचे आई-वडील सतत भांडण करायचे.

फलटणमधील डॉक्टर मृत्यू प्रकरणाची घटना ताजी असतानाच साताऱ्यात आखणी एक धक्कादायक घटना घडलीय. फलटणमध्ये एका तरुणीने गळफास घेत आयुष्याची दोर कापली. दरम्यान तरुणीने आत्महत्या का केली याचे कारणदेखील समोर आले आहे. आचल लखन पवार (वय १८, सोमवार पेठ, फलटण), असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव.

Satara Crime News
Pune Gang War: आंदेकर टोळीतल्या समीर काळेचा भाऊ गणेश काळेला का संपवलं? जुनं कनेक्शन आलं समोर

फलटण शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आचल पवार हिचे आई-वडील सतत भांडण करत होते. तसेच वडील सतत दारू प्यायचे. हाच मानसिक त्रास सहन न झाल्याने आचल हिने राहत्या घरात लोखंडी अँगलला ओढणीने गळफास घेतला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर तिच्या वडिलांनी तिचा गळफास सोडवून तातडीने तिला फलटण येथील शासकीय रुग्णालयात दाखल केलं. पण प्रकृती चिंताजनक बनल्याने तिला बारामती येथील एका खासगी दवाखान्यात दाखल केले. मात्र, शुक्रवारी पहाटे चार वाजता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

Satara Crime News
Akola Crime: 'माझं तुझ्यावर खूप प्रेम; अग्निवीर जवानाकडून लग्नाच्या भूलथापा, 29 वर्षीय किन्नरवर अत्याचार

हॉटेल मॅनेजमेंट करणाऱ्या तरुणीने आयुष्य संपवलं

तळोजा येथील एका इमारतीच्या दहाव्या मजल्यावरून उडी मारून अल्पवयीन मुलीने आपलं जीवन संपवल्याची घटना काही दिवसापूर्वी घडली होती. मृत मुलगी पनवेलमध्ये हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करत होती. ती तिच्या पालकांसोबत इमारतीच्या १० व्या मजल्यावर राहत होती.आत्महत्या केली तेव्हा घरी कोणी नव्हतं. या मुलीने उडी का मारली? ही आत्महत्या होती की घातपात हे अद्यापही कळू शकलेलं नाहीये.

Satara Crime News
पुण्यात गँगवॉर! आंदेकर टोळीतील समीर काळेच्या भावावर गोळीबार; गोळ्या झाडल्यानंतर कोयत्यानं हल्ला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com