Sangli Nitin Palkar Murder : टपरीवर पान खात होता, हल्लेखोरांचा धारदार शस्त्रांनी हल्ला; सांगलीतल्या कुख्यात गुंडाची हत्या

Sangli Islampur Nitin Palkar Murder : सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहरात आज गुरुवारी एका हत्येच्या घटनेनं खळबळ उडाली आहे. या घटनेत कुख्यात गुंड नितीन पालकर याची भरदिवसा धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली.
Islampur Gangster Nitin Palkar Murder
Islampur Gangster Nitin Palkar Murder Saam Tv News
Published On

सांगली : सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहरात आज गुरुवारी एका हत्येच्या घटनेनं खळबळ उडाली आहे. या घटनेत कुख्यात गुंड नितीन पालकर याची भरदिवसा धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली.

इस्लामपूरमधील गुन्हेगारी जगतात दबदबा असलेल्या नितीन पालकर याचा आज गुरुवारी दुपारी खून झाला. वाळवा बाजारसमोर एका पान टपरीजवळ तो थांबला असताना, दोन हल्लेखोरांनी त्याच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. पालकरवर यापूर्वी खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी आणि मारामारी असे अनेक गंभीर गुन्हे दाखल होते. त्याच्या वाढत्या गुन्हेगारी कारवाया लक्षात घेता इस्लामपूर पोलिसांनी त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाईही केली होती. मात्र, गुरुवारी झालेल्या त्याच्या हत्येमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Islampur Gangster Nitin Palkar Murder
Pahalgam Terror Attack : पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला, इकडं महाराष्ट्रातील जळगावमध्ये झाडाझडती, नेमकं काय घडतंय?

दरम्यान, कोल्हापूरमध्ये देखील एक संतापजनक घटना समोर आली आहे. येथे एका तरुणाला विवस्त्र करुन बेदम मारहाण करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. कोल्हापूरच्या मुरगुड परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. चौघांनी केलेल्या जबर मारहाणीत सौरभ कांबळे (वय २४) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर सीपीआर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. सौरभला या नराधमांनी विवस्त्र करून रॉड, काठ्या आणि लाथा बुक्क्यांनी जबर मारहाण केलीय. मारहाण करतानाचा व्हिडिओ देखील मारेकर्‍यांनी काढला आहे. तसेच मारेकऱ्यांनी मारहाण करताना जातीवाचक शिवीगाळ देखील करण्यात आली. दरम्यान, या मारहाणीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

Islampur Gangster Nitin Palkar Murder
Naresh Mhaske : 'जे कधी विमानात बसले नाहीत त्यांना विमानातून परत आणतोय'; खासदार नरेश म्हस्केंचं वादग्रस्त भाष्य

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com