Crime News : क्लासवरुन घरी जाताना सोसायटीच्या ऑफिसमध्ये ओढलं, कोकणात दोन अल्पवयीन मुलींसोबत संतापजनक कृत्य

Raigad Crime News : दोन अल्पवयीन पिडीत मुली क्लासवरून घरी परत जात असताना आरोपीनं दोन्ही मुलींना सोसायटीच्या ऑफिसमध्ये ओढले. दरवाज बंद करून आरोपीने या पीडीत मुलींसोबत असभ्य वर्तन केलं आणि तो फरार झाल्याचं समोर आलं आहे.
Mahad case of molestation of two minor girls
Mahad case of molestation of two minor girlsSaam Tv News
Published On

सचिन कदम, साम टीव्ही

रायगड : रायगड जिल्ह्यातील महाड शहरात दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी ओमकार रजनिकांत रणदिवे (वय २७) याच्या विरोधात महाड शहर पोलीस ठाण्यात बाललैंगिक अपराधापासून संरक्षण कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार असून पोलीस शोध घेत आहेत. दोन अल्पवयीन पिडीत मुली क्लासवरून घरी परत जात असताना आरोपीनं दोन्ही मुलींना सोसायटीच्या ऑफिसमध्ये ओढले. दरवाजा बंद करून आरोपीने या पीडीत मुलींसोबत असभ्य वर्तन केलं आणि तो फरार झाल्याचं समोर आलं आहे.

चंद्रपूरमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार

चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर शहरातील एका वस्तीत राहणाऱ्या दोन अल्पवयीन मुलीवर त्याच वार्डात राहणाऱ्या दोन आरोपीने काही दिवसाअगोदर अत्याचार केल्याची घटना सोमवारी रात्री उघडकीस आली. यानंतर पीडित मुलींच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी रशीद रुस्तम शेख आणि दुसरा आरोपी नसीर वजीर शेख या दोघांना अटक करण्यात आली.

Mahad case of molestation of two minor girls
Cabinet Decision: मंत्रिमंडळाचे ७ महत्वाचे निर्णय, फडणवीस सरकारने राज्याला काय दिलं?

शहरातील वस्तीत राहणाऱ्या पीडित मुलीचे आई-वडील रोज मजुरी करून परिवार चालवितात. पीडित दोन्ही मुलीचे घर एकमेकाशेजारी आहे. दोन्ही पीडित मुली मैत्रिणी आहेत तर त्याच वॉर्डात राहणारे आरोपी रशीद रुस्तम शेख यांनी ओळखीचा फायदा घेत खाऊ देण्याचं आमिष दाखवून मार्च महिन्यात घरी बोलावून दोन्ही अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. दुसऱ्या दिवशी दुसरा आरोपी नसीर वजीर शेख यानेही खाऊचं आमिष दाखवून घरी बोलावून अत्याचार केला. हा प्रकार दोन्ही मुलींसोबत सप्टेंबर महिन्यापासून सुरु असल्याचं पीडितेच्या आईने पोलिसांना तक्रारीत सांगितलं. चिमूर पोलिसांनी रात्री दोन्ही आरोपींना अटक करून ताब्यात घेतलं असून ठाणेदार संतोष बाकल पुढील तपास करीत आहेत.

Mahad case of molestation of two minor girls
Maharashtra Politics: श्रीरामपूरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का, बड्या नेत्यांनी सोडला हात, भाजपचं कमळ घेणार हाती

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com