Crime News: बलात्कार केला, प्रायव्हेट पार्टमध्ये लाल मिर्ची टाकली; पत्नी थेट पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली

Lucknow crime news: लखनऊमध्ये एका विवाहित महिलेनं पतीवर घरगुती हिंसा, हुंड्यासाठी छळ आणि अमानुष अत्याचार केल्याचा गंभीर आरोप केला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून आरोपी फरार असल्याची माहिती आहे.
Lucknow crime news
Lucknow crime newSSaam Tv
Published On

लखनऊमधील गुडम्बा पोलीस ठाण्याच्या परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आलीये. एका विवाहित महिलेनं आपल्या पतीवर घरगुती हिंसा, हुंड्यासाठी छळ, मारहाण तसंच अमानुष अत्याचार केल्याचा गंभीर आरोप केला आहे. तिने केलेल्या आरोपांनुसार, पतीने तिच्यावर बलात्कार आणि प्रायव्हेट पार्टमध्ये लाल मिर्ची टाकली असल्याचा आरोप केलाय. या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

पीडित महिला सीतापूर जिल्ह्यातील मिश्रिख भागातील असून तिचं लग्न ३० ऑक्टोबर २०१० रोजी झालं होतं. लग्नानंतर काही दिवस सगळं ठीक होतं. मात्र काही दिवसांनी पण लवकरच तिच्या आयुष्यात त्रासाची सुरुवात झाली.

Lucknow crime news
Crime News: महिलेने घेतला तरूणाच्या प्रायव्हेट पार्टचा चावा; घरी पोहोचताच व्यक्तीचा मृत्यू

पतीला दारूचं व्यसन

पतीला दारूचं व्यसन असल्याचं तिला समजलं. यानंतर तिचा हुंड्यासाठी सतत छळ सुरू झाला. पती आणि सासरच्या मंडळींकडून १० लाख रुपयांची मागणी केली जात होती. पीडितेने सांगितलं की, वडिलांकडून २ लाख रुपये दिले तरीही तिचा छळ थांबला नाही.

मुलांसह सुनेला काढलं घराबाहेर

यानंतर परिस्थिती अधिकच वाईट झाली. पती, सासू, सासरे आणि दीर यांनी मिळून तिचे दागिने काढून घेतले आणि तिला दोन मुलांसह घराबाहेर काढलं. मात्र इतका त्रास होऊनही तिने हार मानली नाही. त्या महिलेने लखनऊमध्ये भाड्याने खोली घेतली आणि अर्बन कंपनीमध्ये ब्यूटीशियन म्हणून काम करत आपल्या मुलांचा सांभाळ सुरू केला.

पीडितेच्या म्हणण्यानुसार, जून २०२४ मध्ये पतीने माफी मागून पुन्हा एकत्र राहण्याचा बहाणा केला. पण त्यामागे वेगळाच डाव होता. तो तिला फसवून नशेच्या गोळ्या देत होता. १ ऑक्टोबर २०२४ रोजी घडलेली घटना तर अत्यंत क्रूर होती. पतीने जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. ती विरोध करताच त्याने तिच्यावर अमानुष अत्याचार केला आणि तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये लाल मिरची टाकल्याचा आरोप आहे.

Lucknow crime news
Doctor death case: मी तिला मारून टाकलं...! एनेस्थेसियाचा ओव्हरडोस देऊन डॉक्टरने केली पत्नीची हत्या, गर्लफ्रेंडसोबतच्या चॅटमधून खुलासा

जीवे मारण्याचीही दिली धमकी

या घटनेनंतर आरोपी पतीने तिला जीवे मारण्याची धमकी दिली आणि फरार झाला. पीडितेने अनेक वेळा पोलिसांकडे धाव घेतली पण सुरुवातीला तिला योग्य प्रतिसाद मिळाला नाही. मात्र हा प्रकार समोर आल्यानंतर आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर आता पोलिसांनी या प्रकरणात कारवाई सुरू केली आहे.

Lucknow crime news
Crime news India: बाप की सैतान! पोटच्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केली हत्या, पोलिसांकडून पित्याला अटक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com