

ओडिशामध्ये बापाने मुलीवर केला बलात्कार
तक्रारीनंतर आरोपीला पोलिसांनी अटक केली
पीडिता गरोदर राहिली असून तिने बाळाला जन्म दिला
बापाने आपल्या पोटच्या २१ वर्षीय दिव्यांग मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली. ओडिशाच्या ढेंकनाल जिल्ह्यात ही घटना घडली. बापाने मुलीवर बलात्कार केला. गरोदर राहिलेल्या पीडितेने रुग्णालयात मुलीला जन्म दिला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी बापाविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, एका दिव्यांग मुलीवर तिचा बाप गेल्या अनेक महिन्यांपासून लैंगिक अत्याचार करत होता. पीडित तरुणी गरोदर राहिल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. ही घटना ओडिशातील ढेंकनाल जिल्ह्यातील रसोळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात घडली. आरोपी बापाने मुलीच्या शारीरिक आणि मानसिक स्थितीचा फायदा घेत तिच्यावर अनेक वेळा बलात्कार केला. पण ही गोष्ट कुणाच्याच लक्षात आली नाही. पण जेव्हा पीडित मुलगी गरोदर राहिली तेव्हा हे प्रकरण उजेडात आले.
पीडित मुलीच्या शरीरात असामान्य बदल जाणवू लागले तेव्हा तिच्या कुटुंबीयांना संशय आला. त्यानंतर तिला रुग्णालयात नेण्यात आले आणि तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तेव्हा ती गरोदर असल्याचे समोर आले. मुलगी गरोदर असल्याचे कळताच तिच्या आईच्या पायाखालची जमीन सरकली. त्यानंतर पीडितेला ढेंकनाल जिल्हा मुख्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याठिकाणी पीडितेने एका मुलीला जन्म दिला.
पीडित मुलीच्या आईने पोलिस ठाण्यात धाव घेत स्वतःच्या नवऱ्याविरोधात तक्रार दाखल करण्याचे धाडस केले . तिच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. आरोपी ५९ वर्षीय आहे. प्राथमिक चौकशीनंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपीची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. पोलिसांनी सांगितले की, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता तपासाच्या प्रत्येक पैलूची तपासणी केली जात आहे. या घटनेनंतर स्थानिकांमध्ये संतापाची लाट असून त्यांनी आरोपीविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.