नवी दिल्ली : दिल्लीजवळील नोएडामध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. नोएडामध्ये तिघांनी महिलेला अमली पदार्थ पाजून तिच्यावर धावत्या कारमध्ये अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ४ महिन्यांच्या गरोदर महिलेवर तीन वासनांध व्यक्तींनी अत्याचार केल्याचा घृणास्पद प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेनंतर महिला पोलीस ठाण्यात पोहोचली. मात्र, पोलिसांनी तक्रार नोंदवण्यास नकार दिला. त्यानंतर तिने दुसऱ्या पोलीस स्टेशनला पोहोचल्यानंतर तेथील पोलिसांना धक्कादायक माहिती सांगितली.
मीडिया रिपोर्टनुसार, देशाची राजधानी दिल्लीजवळील नोएडामधून धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या नोएडा सेक्टर ६३ मध्ये तिघांनी तरुणीवर अत्याचार केल्याची घृणास्पद प्रकार केला आहे. आरोपी आणि पीडित महिला एकमेकांना ओळखत होते. पीडित महिला ही तिघांपैकी दोघांना चांगली ओळखत होती. त्यातील एकजण तिच्या ऑफिसमधील सहकारी होता. या सहकाऱ्याने महिलेचं ऑफिसमधून अपहरण केलं. त्यानंतर धावत्या कारमध्ये तिच्यासोबत संताजनक कृत्य केलं.
पीडित महिला नोएडा सेक्टर ६३ मधील एका खासगी कंपनीत कार्यरत आहे. २० वर्षीय तरुणी ही बॉयफ्रेंडसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहे. ही तरुणी ४ महिन्यांची गरोदर आहे. ३ जुलै रोजी दुपारी ऑफिसमधील एका सहकाऱ्याने तिला कामानिमित्त सोबत येण्यासाठी सांगितलं. त्यानंतर तरुणी त्याच्यासोबत गेली.
सहकाऱ्याने तिला काकाची तब्येत खराब असून त्यांना पाहण्यासाठी रुग्णालयात जात असल्याचे सांगितले. त्यानंतर पीडित तरुणी दुचाकीवरून त्याच्यासोबत गेली. पुढे खोडा कॉलनीजवळ सहकाऱ्याने दुचाकी थांबवली. त्यानंतर सहकाऱ्याने कारमध्ये बसण्यास सांगितलं. या कारमध्ये सहाकाऱ्याचे आणखी दोन मित्र होते. पीडित तरणी ही त्यातील एका तरुणाला ओळखत होती. तर दुसरा तिच्यासाठी अनोळखी होता.
पीडित तरुणीच्या आरोपानुसार, तिघांनी सॉफ्ट ड्रिंकमध्ये अमली पदार्थ मिश्रित करून पाजलं. त्यानंतर पीडित तरुणी बेशुद्ध झाली. त्यानंतर तिघांनी तिच्यावर अत्याचार केले. पुढे तरुणीला जाग आली. 'मी गरोदर आहे, मला सोडा, अशी विनंती तिने तिघांना केल्याचेही सांगितले. मात्र, तरीही तिघांनी तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तिघांनी पीडित मुलीला तिच्या घरी सोडून पळ काढला.
तरुणी गुन्हा नोंदवण्यासाठी सेक्टर ६३ मधील पोलीस स्टेशनला पोहोचली. त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये तिची तक्रार नोंदवण्यात आली नाही. त्यानंतर पीडित तरुणीने दिल्लीच्या सनलाइट कॉलनी स्थित पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर नोंदवला. पोलिसांनी महिलेची वैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरु केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.