पाकिस्तानातून बेकायदेशीररित्या भारतात आलेल्या सीमा हैदरची सध्या चर्चा आहे. सीमा हैदरवर चित्रपट देखील बनणार आहे. या चित्रपटाचे पहिले पोस्टर निर्मात्यांनी प्रदर्शित केले आहे. त्याचसह चित्रपटातील पहिले गाणे देखील तयार आहे. हे गाणे दोन दिवसांनी म्हणजे २० ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.
सीमा हैदर आणि नोएडाचा सचिन मानी यांच्या प्रेमाची चर्चा तर सर्वत्र होती. या प्रेमकथेला निर्माते अमित जानी मोठ्या पडद्यावर दाखविणार आहेत. चित्रपटामध्ये अभिनेत्री फरहीन फलक सीमा हैदरची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन भारत सिंह करत आहेत.
सीमा हैदरवर आधारित चित्रपट कराची टू नोएडाचे पहिले गाणे २० ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. निर्माते अमित जानी यांनी स्वतः ट्विट लार्त चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. प्रीती सरोजने हे गाणे गायले असून हे गाणे खुद्द अमित जानी यांनी लिहिले आहे. तर या चित्रपटाची निर्मिती जानी फायरफॉक्सच्या बँनर खाली बनणार आहे.
कराची टू नोएडा चित्रपटाचे प्रदर्शित झालेल्या पहिल्या पोस्टरमध्ये सीमा हैदरचे तीन लूक दाखविण्यात आले आहेत. सीमा हैदरची भूमिका साकारत असलेली अभिनेत्री फरहीन फलक पोस्टरवर दिसत आहे. एका लूकमध्ये ती हिजाबमध्ये दिसत आहे. दुसऱ्या लूकमध्ये तिचे केस मोकळे आहेत पण तिच्या चेहऱ्यावर ती त्रासात आहे स्पष्ट होत आहे. तर तिसऱ्या लूकमध्ये तिने साडी नेसली असून, डोक्यावर पदर आणि कपाळावर टिकली आहे.
सीमा हैदर आणि सचिन मीना यांची प्रेमकथा खूपच आगळीवेगळी आहे. सीमा हैदर आणि सचिन मीना यांची लव्हस्टोरी खूप अनोखी आहे. पाकिस्तानातील कराची येथील सीमा हैदर आणि राजधानी दिल्लीला लागून असलेल्या नोएडा येथील सचिन मीना मोबाईलवर PUBG गेम खेळताना एकमेकांच्या प्रेमात पडले.
चार मुलांची आई सीमा हैदर सर्व काही सोडून पाकिस्तानातून छुप्या पद्धतीने भारतात आली आणि सचिनसोबत राहू लागली. मात्र हे गुपित उघड झाल्यावर खळबळ उडाली. सीमा आणि सचिन कायद्याच्या कचाट्यात अडकले. आता या दोघांवर चित्रपटही बनत आहे. (Latest Entertainment News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.