Jaipur Kidnapping Case : पोरासाठी काय पण! बापाने केलं चिमुकल्याचं अपहरण, पोटच्या गोळ्यासाठी पोलीस झाला भिकारी, जयपूरच्या घटनेत मोठा ट्विस्ट

Jaipur Kidnapping Case : जयपूर घटनेत मोठा ट्विस्ट! प्रेम मिळवण्यासाठी तो भिकारी झाला, स्वत:च्याच मुलाचं केलं अपहरण. नेमकं काय घडलं?
Kidnapping Case
Jaipur Kidnapping CaseSaam TV
Published On

जयपूरमधील लहान मुलाच्या अपहरण प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आणि त्याच्या आईकडे सोपवलं. मात्र पोलिसांसमोर चिमुकल्याने आई ऐवजी अपहरण करणाऱ्या व्यक्तीकडे जाण्याचा हट्ट केला. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आता चिमुकल्याने असं नेमकं का केलं? या मागचं थक्क करणारं कारण समोर आलं आहे.

Kidnapping Case
Pune News: आईच्या कुशीत झोपलेलं ७ महिन्यांचं बाळ अज्ञाताने चोरलं; पुण्यातील धक्कादायक घटनेचा VIDEO समोर

किडनॅपरच आहे बाळाचा बाबा

अपहरण झालेल्या बाळाचं नाव पृथ्वी असं आहे. तर आरोपीचं नाव तनुज चाहर असं आहे. मी या मुलाचा बाबा आहे, असा दावा आरोपीने पोलिसांकडे केला आहे. तुम्ही माझी डीएनए (DNA) टेस्ट करा आणि माझं बाळ माझ्या ताब्यात द्या, अशी मागणी तनुजने पोलिसांकडे केली आहे.

प्रेमासाठी पोलिसाची नोकरी सोडली

घटनेबाबत सध्या पोलीस तनुजची चौकशी करत आहेत. या चौकशीमध्ये मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी तनुजचं पृथ्वीच्या आईवर प्रेम आहे. या आधी तनुज यूपी पोलिसांत हेड कॉन्सटेबल म्हणून काम करत होता. आपलं प्रेम मिळवण्यासाठी त्याने पोलिसांची नोकरी सोडून दिली.

प्रेमाला घरच्यांचा विरोध

बाळाची आई तनुजच्या आत्याची मुलगी आहे. दोघेही एकमेकांवर जीवापाड प्रेम करत होते. त्यांच्या कुटुंबीयांना याबद्दल माहिती मिळाल्यावर त्यांनी या नात्याला विरोध केला. तसेच दोघांनाही वेगळं होण्यास सांगितले. त्यानंतर प्रेयसीचं दुसरीकडे लग्न करण्यात आलं. यामुळे तनुज फार दुखावला. त्याने आपल्या प्रेयसीला शोधण्याचा खुप प्रयत्न केला. आपल्या प्रेमासाठी त्याने नोकरी सोडली आणि प्रेयसीच्या शोधात बाहेर पडला.

प्रेयसीचा शोध लागला

काही दिवसांनी त्याला प्रेयसीचा पत्ता मिळाला. त्याने बऱ्याच प्रयत्नांनी प्रेयसीच्या पतीशी बातचीत केली आणि मैत्री वाढवली. त्यानंतर तो नेहमी प्रेयसीच्या घरी येत जात होता. काही दिवसांनी त्यांनी एका बाळाला जन्म दिला. सर्व व्यवस्थित सुरू होतो. मात्र तनुजने प्रेयसीला बाळासह त्याच्याघरी येण्याचा हट्ट केला. प्रेयसी त्यासाठी तयार नव्हती.

१४ जून २०२३ रोजी बाळाचं अपहरण

प्रेयसी आपल्याबरोबर येण्यास तयार नसल्याने त्याने १४ जून २०२३ रोजी बाळाचं अपहरण केलं. त्यावेळी बाळ फक्त ११ महिन्यांचं होतं. आपल्या बाळाचं अपहरण झाल्याचं समजताच त्याच्या आईने पोलिसांत धाव घेतली. तेव्हापासून पोलीस बाळाचा शोध घेत आहेत. आता बाळ २ वर्षांचे झाल्यावर पोलिसांना त्याला शोधण्यात यश आलं.

या दोन वर्षांच्या काळात बाळाला फक्त त्याच्या वडिलांचं प्रेम मिळालं. त्यामुळे पोलिसांसमोर सुद्धा बाळ आईकडे जाण्याऐवजी आपल्या बाबांकडे आणि पोलिसांच्या नजरेत आरोपी असलेल्या तनुजकडे पळू लागलं.

प्रेयसीसाठी पत्नीला सोडलं

या स्टोरीमध्ये आणखी एक थक्क करणारा ट्विस्ट आहे. तनुज स्वत: देखील विवाहित आहे. त्याला एक २१ वर्षांचा मुलगा सुद्धा आहे. मात्र प्रेयसीला मिळवण्याची जिद्द त्याच्या मनात असल्याने त्याने आपल्या पत्नीला सुद्धा सोडून दिलं आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणी देखील तनुजवर गुन्हा दाखल केला आहे.

Kidnapping Case
Bride Escape From Marriage : प्रियकराशिवाय राहू शकत नाही; लग्नमंडपातून नवरी पळाली

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com