Sinnar Crime: हातात तलवार घेऊन रिल्स बनवणं महागात पडलं! पोलिसांनी दिला चोप; ३ रिल्सस्टार ताब्यात

Sinnar Crime: तलवार हातात घेवून रिल्स बनवुन ती इंस्टाग्रामवर अपलोड करणा-या सिन्नर शहरातील तीन तरुणांना नाशिक ग्रामिण स्थानिक गुन्हे शाखेकडून तलवारी जप्त करत चांगला चोप दिल्याचा प्रकार समोर आला आहे.
Nashik Crime News:
Nashik Crime News: Saamtv

तबरेज शेख, नाशिक|ता. २ मार्च २०२४

Nashik Crime News:

तलवार हातात घेवून रिल्स बनवुन ती इंस्टाग्रामवर अपलोड करणा-या सिन्नर शहरातील तीन तरुणांना नाशिक ग्रामिण स्थानिक गुन्हे शाखेकडून तलवारी जप्त करत चांगला चोप दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Crime News in Marathi)

सिन्नर शहरातील शाहु हॅाटेल परीसरात एका पल्सर मोटार सायकलवर बसुन तलवार हातात घेऊन ती हवेत फिरवतानाचा व्हिडिओ काही तरुणांनी सोशल मीडियावर अपलोड केला होता. या माध्यमातून सिन्नर शहरात दहशत पसरवत होते या प्रकाराची माहिती गुप्त बातमीदाराने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे यांना दिली होती.

त्याप्रमाणे सदरील रिल्स बनविणारे व अपलोड करणाऱ्या मुलांच्या वर्णनाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने सिन्नर शहरात शोध घेतला असता ते सातपीर गल्ली परिसरातील असल्याचे समोर आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता रुषिकेश राजेंद्र बोरसे, धिरज बाळु बर्डे अशी त्यांची नावे समोर आली. त्यांच्याकडे रिल्समधील तलवारी बाबत चौकशी केली असता त्यांनी सिन्नर शहरातील ढोके नगर भागात राहनारा ईसम नामे गुरुनाथ भागवत हलकुंडे याच्याकडून घेतल्याचे त्यांनी सांगितले.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Nashik Crime News:
Nagpur Crime News : अमित शहांच्या नावाचा गैरवापर करत व्यापाऱ्याला १ कोटींचा गंडा; नागपुरमधील खळबळजनक घटना

पोलिसांनी हलकुंडे याचा शोध घेत त्याच्याकडे या तलवारींबाबत चौकशी केली. या चौकशीत त्याने तलवारी पंजाब अमृतसर येथुन विकत आणलेल्या असुन त्या सिन्नर शहरालगत मनेगाव रोड येथे गायींच्या गोठयात लपवून ठेवलेल्याचे त्याने कबुल केले. त्यानंतर गोठयात छापा टाकुन २ स्टेनलेस स्टीलच्या तलवारी जप्त करण्यात आल्यात. तसेच याप्रकरणी ३ मुलांना अटक करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

Nashik Crime News:
Deepak Kesarkar: सर्व स्तरांचा विचार करणारा सर्वसमावेशक अंतरिम अर्थसंकल्प: मंत्री दीपक केसरकर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com