Nashik News: महिला घराबाहेर पडताच चोरट्यांनी डाव साधला; दोन तोळ्याची चैन लंपास, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

Woman Gold Chain Stolen CCTV: महिला घराबाहेर पडताच चोरट्यांनी तिच्या गळ्यातील सोनसाखळी लंपास केलीय. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीय.
दोन तोळ्याची चैन लंपास
Woman Gold Chain Stolen CCTVSaam Tv
Published On

तबरेज शेख, साम टीव्ही नाशिक

नाशिकमध्ये महिला घराबाहेर पडताच तिच्या गळ्यातील सोनसाखळी लंपास केलीय. ही घटना आडगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत स्वामी समर्थ नगर या ठिकाणी घडली आहे. चोरीची ही धक्कादायक घटना सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झालीय. सोनसाखळी दोन तोळ्याची होती. या घटनेमुळे सध्या स्वामी समर्थ नगर परिसरात दहशतीचं वातावरण आहे. हा सीसीटीव्ही मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

कशी घडली घटना?

एक महिला कोचिंग क्लासच्या बाहेर रस्त्यावर आपल्या लहान मुलाची वाट बघताना दिसत आहे. इतक्यात तेथे एक दुचाकीवर दोन तरूण येतात. त्यातला एक तरूण खाली उतरतो, तर दुसरा गाडी घेवून थोडा दूर जावून (Nashik Crime News) थांबतो. तेवढ्यात खाली उतरलेला तरूण फोनवर बोलत महिलेच्या अवतीभवती फिरतो, संधी साधत तिच्या गळ्यातील सोन्याची चैन खेचतो. त्यानंतर ते दोन्ही तरूण दुचाकीवरून निघून जातात, महिला चोरट्यांचा पाठलाग करताना सीसीटीव्हीत दिसत आहे.

सोनसाखळीवर डल्ला मारला

चोर महिलेवर नजर ठेवून बंगल्याबाहेर घिरट्या मारत असल्याचं समोर आलंय. मंदाकिनी अरूण निकम असं या महिलेचं नाव आहे, तर तिचं वय ५८ वर्ष असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. स्वामी समर्थ नगर परिसरात ही घटना सोमवारी ५ ऑगस्ट रोजी सायंकाळी घडली (Crime News) आहे. याप्रकरणी चोरीचा गुन्हा नोंदवर आडगाव पोलीस अधिक तपास करत आहेत.

दोन तोळ्याची चैन लंपास
Dombivli Crime: चोरीसाठी घरगडी झाला, मेहुण्यासोबत घरावर डल्ला मारत १५ लाख लंपास, डोंबिवली पोलिसांनी टोळीचा पर्दाफाश केला

घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

नाशिक शहरात सोनसाखळी हिसकावणाऱ्या चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. चोरीचा हा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय. सध्या नाशिकमध्ये असे चोरीचे अनेक प्रकार घडत आहेत. यामुळे महिलांमध्ये प्रचंड दहशत निर्माण (Gold Chain Stolen) झालीय. ही सोनसाखळी ७० हजारपेक्षा देखील अधिक किमतीची असल्याचं सांगितलं जात आहे. भररस्त्यात चोरट्यांनी डाव साधत महिलेच्या सोनसाखळीवर डल्ला मारलाय.

दोन तोळ्याची चैन लंपास
Sambhajinagar Crime : संभाजीनगरमधून तीन महिन्यापूर्वी एटीएम केले लंपास; सेलू तालुक्यात एका विहिरीत सापडले मशीन

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com