Mumbai Accident : दारु ढोसून ट्रिपल सीट दुचाकी दामटावली, ऐन रस्त्यात गाडी स्लिप, दोघांचा जागीच मृत्यू; मुंबईत भीषण अपघात

Bike Accident Gorai: तीनही तरुणांनी मद्यप्राशन केले असल्याची प्राथमिक माहिती असून दुचाकीवरून ट्रिपल सीट जात असताना तलावाजवळील रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे बाईक घसरून हा अपघात झाला.
Bike Accident Gorai
Bike Accident GoraiSaam Tv News
Published On

मुंबई : मुंबईच्या गोराई परिसरात असलेल्या वैराल तलावाजवळील हिल व्ह्यू हॉटेलजवळ आज सकाळी दुचाकी गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोन तरुणांचा जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. आज सकाळच्या सुमारास ही घटना घडली. हे तीनही तरुण सायन कोळीवाडा परिसरात राहणारे असून सहलीसाठी गोराई परिसरात आले होते. तीनही तरुणांनी मद्यप्राशन केले असल्याची प्राथमिक माहिती असून दुचाकीवरून ट्रिपल सीट जात असताना तलावाजवळील रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे बाईक घसरून हा अपघात झाला. अपघात इतका गंभीर होता की यात दोन तरुणांचा जागेवरच मृत्यू झाला असून एक तरुण गंभीर जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सायन कोळीवाडा परिसरात राहणारे तीन तरुण सहलीसाठी दुचाकीवरून गोराई परिसरात आले होते. तिघांनीही मद्यप्राशन करून दुचाकीवरून गोराई परिसरात फिरत होते. गोराई येथील वैराग तलावाजवळ आले असता पावसामुळे रस्त्यावर जमा झालेल्या पाण्यामुळे दुचाकी घसरून अपघात झाला अपघात इतका गंभीर होता की या अपघातात दोन तरुणांचा जागेवरच मृत्यू झाला. तर एक तरुण गंभीर जखमी झाला आहे जखमेला जवळच्या महापालिका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजतं.

Bike Accident Gorai
Uddhav-Raj Thackeray: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याचं पीएम मोदी, एकनाथ शिंदेंना निमंत्रण; ट्विट करत संजय राऊतांनी डिवचलं

घटनेची माहिती मिळताच गोराई पोलीस घटनास्थळी दाखल झालं असून पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमी तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं तर मृत तरुणांचं पार्थिव रुग्णवाहिकेच्या मदतीने शवविच्छेदन करण्यासाठी महापालिका रुग्णालयात पाठविले आहेत. पोलिसांकडून या अपघाताचा पुढील तपास सुरू आहे. मद्यप्राशन आणि वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन या भीषण अपघाताला कारणीभूत ठरलं आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. स्थानिक नागरिक आणि पर्यटकांनी सुरक्षित वाहतुकीबाबत अधिक सजग राहण्याचं आवाहन प्रशासनाने केलं आहे.

Bike Accident Gorai
Sangitatai Pawar : दगडाने ठेचून खून, त्याचवेळी मंदिरात चोरी; महिला कीर्तनकार हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com