
गोव्यातील डान्स इव्हेंटमध्ये झालेल्या ओळखीतून नृत्यांगनेवर बलात्कार
सरावादरम्यान आरोपीने पीडितेला दारू प्यायला दिली.
तब्बल सात महिने उशिरा पोलिसांकडे धाव घेतली.
संजय गडदे, साम प्रतिनिधी
आरे कॉलनीत एका नृत्यांगनेवर बलात्कार झाल्याची घटना घडलीय. डान्स इव्हेंटमध्ये ओळख झाल्यानंतर कामाच्या आमिष दाखवत नृत्य प्रशिक्षक आणि इव्हेंट ऑर्गनायझर पीडितेवर अत्याचार केला. याप्रकरणी आरे पोलिसांनी २२ वर्षीय नृत्य प्रशिक्षक आणि इव्हेंट ऑर्गनायझरला अटक केलीय.
३२ वर्षीय व्यावसायिक डान्सर अंधेरीत राहणारी असून ती चित्रपट व स्टेज शोमध्ये डान्सरचं काम करते. तर आरोपी हा मालाडचा रहिवासी असून डान्स प्रशिक्षक आणि कार्यक्रम आयोजक आहे. पीडितेच्या तक्रारीनंतर आरे पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमाखाली गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली. आरोपीला सध्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलंय.
मिळालेल्या माहितीनुसार, दोघांची ओळख यावर्षी जानेवारीत गोव्यात झालेल्या डान्स इव्हेंटमध्ये झाली. त्यानंतर पीडितेला नोकरी नसल्याने तिने आरोपीशी संपर्क साधला. मार्च महिन्यात ते दोघे अंधेरीतील मॉलमध्ये भेटले. पुढे आरे कॉलनीतील रॉयल पाम्स येथील बंगल्यात डान्स प्रॅक्टिससाठी गेले. सरावादरम्यान आरोपीने दारू प्यायला दिली व नंतर पोहण्याच्या तलावाजवळ आणि नंतर बंगल्यात तिला जबरदस्तीने दोन वेळा बलात्कार केला.
धक्क्यातून सावरण्यास वेळ लागल्याने पीडितेने तब्बल सात महिन्यानंतर पोलिसांत तक्रार केली. दरम्यान या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक संपत घुगे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.