Nagpur Crime : ८ महिन्यांच्या गर्भवती महिलेची निर्घृण हत्या, मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकला अन्...

Nagpur : नागपूरमध्ये सावनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीत रस्त्याच्या कडेला एका महिलेचा मृतदेह आढळून आला. तपासादरम्यान ही महिला आठ महिन्यांची गर्भवती असल्याची धक्कादायक माहिती समोर आली.
Nagpur Crime
Nagpur Crimesaam tv
Published On
Summary
  • नागपूरमध्ये एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला

  • महिलेचा खून करुन रस्त्याचा कडेला मृतदेह फेकल्याचा संशय

  • महिला ८ महिन्यांची गर्भवती असल्याची धक्कादायक माहिती

पराग ढोबळे, साम टीव्ही, प्रतिनिधी

Nagpur News : नागपूरमधून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नागपूरमध्ये सावरमेंढा शिवारात एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तपासादरम्यान ही महिला गरोदर असल्याचे स्पष्ट झाले. गरोदर महिनेचा खून करुन तिचा मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरच्या सावनेर पोलीस स्टेशन हद्दीच्या पाटणसावंगी पोलीस चौकी अंतर्गत येणाऱ्या सावरमेंढा शिवारात एका अज्ञात महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. मृतदेह कुजायला सुरुवात झाल्याने दुर्गंधी सुटल्याने हा प्रकार समोर आला. रस्त्याच्या कडेला गरोदर महिलेचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली.

Nagpur Crime
26/11 मुंबई हल्ल्यात शौर्य दाखवणाऱ्या NSG कमांडोला अटक, २०० किलो गांजासह ATS ने रंगेहाथ पकडले

पोलिसांसह फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली. अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी धावून जाणाऱ्या आधार फाउंडेशन टीमने मृतदेहाचा पंचनामा करण्यात मदत केली. त्यानंतर महिलेचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आला. ही महिला आठ महिन्याची गर्भवती असल्याची धक्कादायक माहिती उत्तरीय तपासणीदरम्यान समोर आली.

Nagpur Crime
Indian Army Chief : यावेळी तुम्हाला नकाशावरून गायब करु, भारताच्या लष्करप्रमुखांचा पाकिस्तानला सज्जड दम

मृतदेहाची ओळख अद्याप पटली नसून महिलेचा मृतदेह २ दिवसांपेक्षा अधिक कालावधीपासून रस्त्याच्या कडेला होता अशी माहिती मिळाली आहे. मृतदेह कुजायला सुरुवात झाल्याने हितज्योती आधार फाउंडेशनच्या सहकार्याने पोलिसांनी अंतिम संस्कार केला. या महिलेचा गळा आवळून तिची हत्या करण्यात आली आणि त्यानंतर तिचा मृतदेह रस्त्याच्या कडेला झुडपात फेकून देण्यात आला. दुर्गंध यायला सुरुवात झाल्याने ही बाब उघडकीस आली. मृतदेह कोणाचा होता हे शोधण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरु केले आहेत.

Nagpur Crime
Crime : हत्येचा Live Video! १२ सेकंदात झाडल्या ३ गोळ्या, बाईकवरुन पळताना Reel सुद्धा बनवली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com