Crime News:
Crime News: saam tv

Palghar Crime: 'पप्पा ३० हजार पाठवा, मला मारुन टाकतील...' मुलानेच रचला अपहरणाचा बनाव; कारण ऐकून पोलिसही चक्रावले

Crime News In Marathi: मुलाने पाठवलेला क्युआर कोड ओळखीचा वाटल्याने वडिलांना संशय आला. ज्यामुळे त्यांनी पैसे न पाठवता पोलिसांत तक्रार दाखल केली. ज्यानंतर हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले.
Published on

Palghar Crime News:

वडिलांपासून पैसे घेण्यासाठी २० वर्षीय मुलानेच स्वतःच्या अपहरणाचा बनाव रचल्याची धक्कादायक अन् तितकीच चक्रावून टाकणारी घटना समोर आली आहे. पालघर जिल्ह्यातील फादरवाडी भागातील हे प्रकरण आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Crime News In Marathi)

याबाबत सविस्तर माहिती अशी की, वसईतील (Vasai) फादरवाडी भागातील २० वर्षीय मुलगा घरातून बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या वडिलांनी पोलिसात केली होती. त्यांचा मुलगा ७ डिसेंबरला घरातून निघून गेला जो पुन्हा परत आला नसल्याचे या तक्रारीत म्हणले होते. तसेच मुलाने त्यांना फोन करुन अपहरण झाल्याचेही सांगितले होते.

मुलाने वडिलांना फोन करुन "तीन जणांनी माझे अपहरण केले आहे. ते ३० हजार रुपयांची मागणी करत आहेत. खंडणी दिली नाही तर मला मारुन टाकतील..." असे म्हणत एक QR कोडही पाठवल्याचे त्यांनी या पोलिस तक्रारीत म्हणले होते.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Crime News:
Beed Water Pollution: बीड जिल्ह्यात नागरिकांच्या आरोग्याला धोका? पिण्याच्या पाण्याबाबत धक्कादायक वास्तव उघडकीस

या तक्रारीनंतर मुलाच्या तपासासाठी पोलिसांची चार पथके तयार करण्यात आली आणि वसई, विरार, नालासोपारा आणि इतर ठिकाणी मुलाचा शोध घेतला. अखेर पोलिसांनी शनिवारी (९, डिसेंबर) वसई फाटा येथून या मुलाचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले. ज्यामध्ये धक्कादायक खुलासा झाला.

मुलाला त्याची गाडी दुरूस्त करण्यासाठी वडिलांकडून पैसे हवे होते. मात्र वडील पैसे द्यायला तयार नव्हते. त्यामुळेच हा सगळा अपहरणाचा बनाव रचल्याचे समोर आले. पोलिसांनी या मुलाला ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे. दरम्यान, मुलाने पाठवलेला क्युआर कोड ओळखीचा वाटल्याने वडिलांना संशय आला. ज्यामुळे त्यांनी पैसे न पाठवता पोलिसांत तक्रार दाखल केली. (Latest Marathi News)

Crime News:
Manodhairya Scheme Maharashtra: शिंदे सरकारचा मोठा निर्णय! पीडित महिला आणि बालकांना मिळणार १० लाखांपर्यंत मदत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com