Beed Water Pollution: बीड जिल्ह्यात नागरिकांच्या आरोग्याला धोका? पिण्याच्या पाण्याबाबत धक्कादायक वास्तव उघडकीस

Beed Contaminated Water: मागील 11 महिन्यांत 9 हजार 938 पाणी नमुने घेण्यात आले आहेत. यातील तब्बल 1 हजार 347 नमुने दूषित आढळले आहेत.
Beed Water Pollution
Beed Water PollutionSaam TV
Published On

विनोद जिरे

Beed News:

बीड (Beed) जिल्ह्यात दूषित पाण्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. जिल्ह्यातील प्रत्येक गावात पाणीपुरवठा करणाऱ्या विहीर, बोअर यांच्यासह जलसाठ्यांचे पाणी नमुने प्रशासनाकडून घेतले जात असतात. मागील 11 महिन्यांत 9 हजार 938 पाणी नमुने घेण्यात आले आहेत. यातील तब्बल 1 हजार 347 नमुने दूषित आढळले आहेत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो.

Beed Water Pollution
Water Crisis: राज्यावर भीषण पाणीटंचाईचं संकट, धरणांमध्ये केवळ इतकाच पाणीसाठा; अनेक शहरांत पाणीकपातीला सुरुवात

दूषित पाण्याचा (Water Pollution) हा धोका टाळण्यासाठी नागरिकांसह ग्रामपंचायतींनी काळजी घेण्याची गरज आहे. वेळीच जलसाठे शुद्ध करण्यासह तुरटीचा वापर करणे गरजेचे असल्याचं सांगण्यात येत आहे.

जिल्ह्यात सर्वात शुद्ध पाणी गेवराई तालुक्यात

गेवराई तालुक्यात ग्रामीण भागातून 60 तर शहरी भागातून 38 असे 98 नमुने घेण्यात आले होते. यात एकही नमुना दूषित आढळला नाही, त्यामुळे या तालुक्यात शुद्ध पाणीपुरवठा होत असल्याचे सिद्ध झाले आहे.

जिल्ह्यात सर्वाधिक दूषित पाणी पाटोदा तालुक्यात

नोव्हेंबर महिन्यात घेतलेल्या नमुन्यांमध्ये पाटोदा तालुक्यात सर्वात जास्त पाणी नमुने दूषित आढळले आहेत. या तालुक्यातून 39 नमुने घेतले आहेत. यातील 12 दूषित आढळले असून याचा टक्का 30 एवढा आहे.

दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. अनेक मोठमेठे आजार दूषित पाण्यातून होतात. अस्वच्छ पाण्याचे सेवन केल्याने पोट दुखीच्या समस्या वाढतात. काही व्यक्तींना स्टोनचे आजार देखील होतात. तसेच पित्त आणि मळमळ अशा समस्याही उद्भवतात. त्यामुळे वेळीच गावातील प्रदूषण रोखून पिण्यासाठी स्वच्छ पाण्याची सुविधा करणे गरजेचे आहे.

Beed Water Pollution
Water Shortage In Shahapur : शहापूर तालुक्यात विहिर अधिग्रहणचे प्रस्ताव पडलेत धुळखात, महिलांची पाण्यासाठी भटकंती

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com