Mumbai Crime : बर्थडे सेलिब्रेशननंतर टोकाचा वाद; जिने दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या, मित्रानं केला तिच्याच आयुष्याचा शेवट

मुंबई : मुंबईतील कांदिवली परिसरात एका तरुणानं वाढदिवशी भेटायला आलेल्या तरुणीचीच हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ज्या मित्राला वाढदिवशी दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या, त्यानंच तिच्या आयुष्याचा शेवट केला.
Mumbai Crime News
Mumbai Crime NewsSaam tv

कांदिवली, मुंबई :

मुंबईतील कांदिवली परिसरात एका तरुणानं वाढदिवशी भेटायला आलेल्या तरुणीचीच हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ज्या मित्राला वाढदिवशी दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या, त्यानंच तिच्या आयुष्याचा शेवट केला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली असून, त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

Mumbai Crime News
Pune Crime: धक्कादायक! तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल

कांदिवली परिसरात रविवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली. बर्थडे सेलिब्रेशनसाठी आलेल्या ३० वर्षीय मैत्रिणीची तिच्याच मित्राने क्रूरपणे हत्या केली. हेमाकुमारी असं तरुणीचं नाव होतं. तर डुंबर बहादूर विश्वकर्मा असं आरोपी तरूणाचं नाव आहे.

हेमाकुमारी ही आरोपी विश्वकर्माच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी त्याच्याकडे आली होती. त्यावेळी दोघांमध्ये काही गोष्टींवरून वाद झाला. बाचाबाचीनंतर वाद विकोपाला गेला. आरोपीनं रागाच्या भरात तिचं डोकं आपटलं, अशी माहिती पोलिसांनी दिली.

मित्रानंच केला घात

विश्वकर्मा हा वॉचमन म्हणून काम करतो. तो कांदिवली पूर्वेकडील अशोकनगरातील एका इमारतीत राहतो. तिथेच तो काम करतो. त्याचा रविवारी वाढदिवस होता. त्याला भेटण्यासाठी मैत्रीण हेमाकुमारी आली होती. तिनं सेलिब्रेशन केलं. त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या. सेलिब्रेशन करताना विश्वकर्मा भरपूर दारू प्यायला. त्यानंतर कोणत्या तरी गोष्टींवरून दोघांमध्ये जोराचं भांडण झालं. बाचाबाची झाली. हा वाद विकोपाला गेला.

विश्वकर्मानं हेमाकुमारीला लाथाबुक्क्यांनी मारलं. त्यानंतर तिचं डोकं आपटलं. यात गंभीर जखमी झालेल्या हेमाकुमारीचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

https://saamtv.esakal.com/maharashtra/buldhana-crime-news-young-boy-killed-by-friend-due-to-a-dispute-over-dancing-rsj99

आरडाओरड आणि किंचाळ्या

सूत्रांच्या माहितीनुसार, दोघांमध्ये जोराचं भांडण झालं. या भांडणाचा आवाज इमारतीमधील रहिवाशांपर्यंत पोहोचला. विश्वकर्मा तिला मारहाण करत होता. किंचाळ्याही ऐकू जात होत्या. त्यानंतर इमारतीतील काही रहिवाशांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. जखमी तरुणीला रुग्णालयात नेलं. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.

या प्रकरणी पोलिसांनी विश्वकर्माला ताब्यात घेतलं आणि त्यानंतर अटक केली. त्याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Mumbai Crime News
Malegaon Crime News : जुन्या वादातून तरुणाचा खून; संपूर्ण घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com