Malegaon Crime News : जुन्या वादातून तरुणाचा खून; संपूर्ण घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

Nashik News : जुन्या वादातून रात्रीच्या सुमारास ही घटना घडली असून खून झाल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली
Malegaon Crime News
Malegaon Crime NewsSaam tv

अजय सोनवणे 

मनमाड (नाशिक) : जुन्या वादातून भर रस्त्यात तरुणावर धारदार शस्त्राने वार करत तरुणाची हत्या करण्यात आली. ही घटना (Nashik) नाशिकच्या मालेगाव शहरातील संगमेश्वर भागात घडली असून या घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.  (Latest Marathi News)

Malegaon Crime News
Gadchiroli–Chimur Lok Sabha Constituency : गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात मतदानासाठी प्रशासन सज्ज, अतिदुर्गम केंद्रांवरील कर्मचा-यांसाठी हेलिकॉप्टर तैनात

रफिक शेख असे या घटनेत मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. जुन्या वादातून रात्रीच्या सुमारास ही घटना घडली असून (Crime News) खून झाल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. जुन्या वादातून काही तरुणांनी रफिक याच्यावर शस्त्राने वार केले. त्यांच्यापासून बचाव करण्यासाठी रफिक हा रक्तबंबाळ (Malegaon) अवस्थेत रस्त्याने धावत होता. दरम्यान तरुण रस्त्याने पळत जात असतांना तो खाली कोसळला. यानंतर त्याचा मृत्यू झाला.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा) -

Malegaon Crime News
Jowar Price Decrease: नागरिकांसाठी दिलासादायक बातमी! ज्वारीच्या दरात १० ते २० रुपयांनी घसरण; जाणून घ्या भाव

घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद 

या संपूर्ण घटनेचा काही भाग हा सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. दरम्यान घटना घडल्याने अप्पर (Police) पोलिस अधिकांनी घटनास्थळी भेट देत पाहणी करत पंचनामा केला. पोलिस अधिक तपास करीत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com