Crime News: प्रेमाचा दुर्दैवी शेवट! दोघी बहिणींनी जिथं आयुष्याचा शेवट केला, तिथंच विरहामुळं दोघा भावांनी मृत्यूला कवटाळलं

Surat Crime News: सुरतमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. सुरतमधील अलठण परिसरात दोन चुलत भावांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. काही दिवसांपूर्वी याच दोघांच्याही गर्लफ्रेंडने गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
Crime News
Crime NewsSaam Digital
Published On

Surat Two Cousin Brother Hang Himself For Love:

सुरतमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. सुरतमधील अलठण परिसरात दोन चुलत भावांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. काही दिवसांपूर्वी याच परिसरात दोघांच्या गर्लफ्रेंड असलेल्या चुलत बहिणींनी आपले जीवन संपवले होते.

सोमवारी सकाळी अलठण परिसरात त्यांनी एका झाडाला लटकून गळफास घेतला आहे. नरेंद्र वर्मा (वय १९) आणि पुष्पेंद्र वर्मा (वय १८)अशी मृत भावांची नावे आहेत. ज्या झाडाला त्यांच्या गर्लफ्रेंडने गळफास घेतला होता. त्याच ठिकाणी त्यांनीदेखील आपले आयुष्य संपवले आहे. (Latest News)

हे दोघे भाऊ सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करत आहेत. काही दिवसांपूर्वी आपल्या गर्लफ्रेंडने आत्महत्या केल्याने ते दोघेही तणावात होते. कुटुंबियांच्या सांगण्यामुळे त्यांनी या मुलींशी लग्न करण्यास नकार दिला होता. त्यामुळेच निलम शर्मा आणि तिची चुलत बहिण रोशनी शर्मा यांनी झाडाला गळफास घेत आत्महत्या केली होती. त्यानंतरच या दोन भावांनी हे टोकाचे पाऊल उचलले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, निलम आणि रोशनीला नरेंद्र आणि पुष्पेंद्रशी लग्न करायचे होते. परंतु कुटुंबियाच्या नकारामुळे नरेंद्रेने दुसऱ्या मुलीशी लग्न केले आणि त्याला एक मुलगादेखील होता. त्यामुळेच त्याने निलमशी लग्न केले नाही. तर पुष्पेंद्रनेदेखील रोशनीशी लग्न करण्यास नकार दिला.

Crime News
Paithan Crime : लोखंडी फावड्याने मारून तरूणाचा खून; पैठण शहरातील घटना

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी निलम आणि रोशनी लग्न करण्यासाठी घरातून पळून आल्या होत्या. याची माहिती नरेंद्रने मुलींच्या भावालादेखील अलठणला बोलावले. परंतु कुटुंबीय पोहचण्याआधीच या दोघींनी आत्महत्या केली.

Crime News
Pune Breaking News: पुणे ड्रग्ज प्रकरणात मोठी कारवाई, पोलिसांनी FDI-MIDCच्या मदतीने कंपनी सील

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com