Pune Breaking News: पुणे ड्रग्ज प्रकरणात मोठी कारवाई, पोलिसांनी FDI-MIDCच्या मदतीने कंपनी सील

Pune Narcotics Case: पुणे ड्रग्ज प्रकरणात मोठी अपडेट आहे. पोलिसांनी ड्रग्ज बनविणारी कंपनी सील केली आहे.
Pune Narcotics Case
Pune Narcotics Case Saam Tv

Pune Crime Narcotics Case Update

पुणे (Pune) ड्रग्ज प्रकरणामध्ये दिवसेंदिवस मोठे धक्कादायक खुलासे होत आहेत. आता या प्रकरणी पुणे पोलिसांनी एफडीए, एमआयडीसीसोबत पत्रव्यवहार केल्याची माहिती मिळत आहे. कुरकुंभ येथील कंपनीवर कारवाई करण्याच्या सुचना पोलिसांनी या पत्रात केल्या आहेत. तिन्ही विभागांना तेथे कारवाई करण्याच्या सुचना केल्या आहेत.  (Latest Crime News)

कुरकूंभ येथील मेफेड्रॉन निर्मिती करणार्‍या अर्थ केम लॅबोरटरीज् कंपनीच्या अनुषंगाने पुणे पोलिसांनी प्रदूषण नियंत्रण महामंडळ, औद्योगिक विकास महामंडळ आणि अन्न औषध प्रशासनाबरोबर पत्रव्यवहार केला (Pune Police Correspondence with FDA MIDC) आहे. इतर केमीकल उत्पादनाच्या नावाखाली येथे अमली पदार्थ तयार करण्यात उद्योग सुरू होता, अशी माहिती मिळतेय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Pune Narcotics Case
Pune Sangli News: पुण्यातील ड्रग्जचे सांगली कनेक्शन, 300 कोटींचा 140 किलो एमडी ड्रग्ज जप्त

केम लॅबोरटरीज् कंपनी सील

यापुर्वी देखील कुरकूंभ औद्योगिक वसाहतीत दोन कंपन्यात अमली पदार्थ तयार केले जातअसल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर देखील औद्योगिक विकास महामंडळ, प्रदुषण नियंत्रण महामंडळ आणि एफडीए यांच्या हा प्रकार निदर्शनास कसा आला नाही, हा मोठा सवाल उपस्थित होत आहे. याप्रकरणी कारवाई करत पोलिसांनी अर्थ केम लॅबोरटरीज् ही कंपनी सील केली (Chem Laboratories Company Seal) आहे.

अनिल साबळे आणि युवराज भुजबळ यांनी कुरकुंभ येथे एमडीचा कारखाना सुरू केला होता, अशी माहिती दोन दिवसांपूर्वी समोर आली होती. पुणे पोलिसांनी याप्रकरणी अधिक तपास (Narcotics Case) केला. त्यानंतर पुणे पोलिसांनी एफडीए, एमआयडीसीसोबत पत्रव्यवहार केला आणि केम लॅबोरटरीज् या कंपनीवर कारवाई केली आहे.

पुणे ड्रग्ज प्रकरण्याचं देशभर नेटवर्क

पुण्यात आणि इतर ठिकाणी ४००० कोटी रुपयांचे ड्रग्स मिळून आले (Pune Narcotics Case) आहेत. पुणे जिल्ह्यात ड्रग्ज बनवण्याचा कारखाना सापडला आहे. ललित पाटील प्रकरण तपास सरकारने पूर्ण केलेला नाही. सरकारने संजीव ठाकूर यांना पाठीशी घातले. त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. ललित पाटील प्रकरणा वेळीच मी ड्रग्ज प्रकरणी आंतरराष्ट्रीय रॅकेट असल्याचं म्हटलं होतो, अशी माहिती कसबा आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

पुण्यात अनेक ललित पाटील कार्यरत आहेत. पुणे पोलीस आयुक्तांनी पबबाबत निर्णय घेतला आहे, याच पबमध्ये ड्रग्ज मिळत असल्याचा दावा त्यांनी केली आहे. पब संस्कृती पुण्यात नसावी, हे पुणेकरांचे मत (Pune Crime News) आहे. ४००० कोटी रुपयांचे ड्रग्ज सापडणे, म्हणजे पुणे पोलिसांचे अपयश आहे. पोलीस यंत्रणा करतेय काय? गुप्तचर यंत्रणा आणि पोलिसांची एलआयबी काय करत आहेत, असा प्रश्न यावेळी त्यांनी विचारला आहे.

Pune Narcotics Case
Pune Breaking News: पुण्यातील ड्रग्ज रॅकेटचा कोडवर्ड आला समोर; गुन्हे शाखेने 'अशी' केली उकल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com