Shocking News: भांडण झालं, वाद विकोपाला गेला, वडिलांनीच मुलाला संपवलं; वाकोला हादरलं

Father Killed Son: वाकोल्यात वडिलांनीच मुलाची हत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Crime News
Crime NewsYandex

सुरज सावंत

Father Killed Son With Knife In Vakola

वाकोल्यात वडिलांनीच मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकोल्याच्या दत्तमंदीररोड (Mumbai Crime News) वाघरीपाडा परिसरात आरोपी दिनेश गुप्ता आपल्या कुटुंबासोबत राहात होते. रविवारी रात्री त्यांचे मुलासोबत भांडण झालं अन् रागाच्या भरात त्यांनी टोकाचं पाऊल उचललं. (Latest Crime News)

रविवारी रात्री दिनेश गुप्ता यांचा मुलगा आलोकसोबत वाद झाला. मुलगा आलोक वडिलांचं ऐकत नव्हता. नेहमी त्यांना उलट उत्तरे द्यायचा. या कारणावरून बापलेकात नेहमीच भांडण होत ( Father Killed Son) होतं. रविवारी रात्री देखील त्यांच्यात नेहमीप्रमाणे भांडण झालं होतं. परंतु यावेळी वाद विकोपाला गेला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

याच वादात राग अनावर झालेल्या वडिल दिनेश यांनी किचनवरील चाकूने (Knife) आलोकवर हल्ला केला. या हल्यात आलोकच्या पोटाला गंभीर दुखापत झाली. तातडीने आलोकला पुढील उपचारासाठी जवळील व्हि.एन. देसाई रुग्णालयात नेण्यात (Mumbai Crime) आलं. तेथे त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान आलोकचा मृत्यू झाला आहे.

रविवारी (२४ मार्च) रात्री ही घटना घडलीय. याप्रकरणी सोमवारी गुन्हा दाखल करून आरोपी वडिलांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी वाकोला पोलीस ठाण्यात मुलाच्या हत्येप्रकरणी वडिल दिनेश गुप्ता याच्यावर गुन्हा दाखल (Father Killed Son In Vakola) करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. वाकोल्यात वडिलांनीच मुलाची हत्या केल्याची घटना घडलीय.

Crime News
Pune Crime: मुलीला अपशब्द वापरले, संतापलेल्या नातेवाईकाच्या मारहाणीत तरूणाचा मृत्यू; बिबेवाडीतील खळबळजनक घटना

अहमदनगरमधील घटना

अहमदनगर तालुक्यातील पिंपळगाव लांडगा येथे चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीसह २ मुलींना जिवंत जाळल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. सुनील लांडगे आरोपीचं नाव आहे. मृत पत्नीचं नाव लीलाबाई लांडगे आहे. खुशी लांडगे आणि साक्षी लांडगे या त्यांच्या मुलींचाही आगीत होरपळून मृत्यू झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, या प्रकरणी आरोपीला नगर तालुका पोलिसांनी ताब्यात ( Crime News) घेतलंय. तो मागील काही दिवसांपासून पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यावरून दोघांमध्ये अनेकवेळा भांडणं झाली होते. वाद विकोपाला जाऊन पतीने रागाच्या भरात पत्नीची हत्या केली.

Crime News
Crime News: झोपेतच हत्या केली नंतर पेट्रोल टाकून जाळले; 5 कोटींच्या प्रॉपर्टीसाठी चुलत भाऊ अन् काकाने केला घात

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com