संजय गडदे, साम प्रतिनिधी
राष्ट्रवादी नेते बाबा सिद्धिकी यांच्या हत्येची घटना ताजी असतानाच शहरात अजून एका राजकीय पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीची हत्या झालीय. मुंबईच्या मालाड पूर्वेमध्ये मनसे कार्यकर्त्याची हत्या झालीय. मनसेकडून पोलिसांचं तपासावर प्रश्नचिन्ह? उपस्थित केले जात आहे.
बाबा सिद्दिकी यांना वेगळा न्याय आणि मनसे कार्यकर्ताला वेगळा न्याय का? असा सवाल मनसेकडून उपस्थित केला जात आहे. अधिकच्या माहितीनुसार, मुंबईच्या मालाड पूर्वेत दिंडोशी परिसरात मनसे कार्यकर्त्याची हत्या झालीय. रिक्षा चालक आणि स्थानिक फेरीवाल्यांकडून मनसे कार्यकर्त्याची हत्या झाल्ंयाचं सांगण्यात आली. मनसे कार्यकर्ता आकाश माईन वय २७ वर्ष आहे.
माईन हे दसरानिमित्त काल संध्याकाळी नवीन गाडी घेण्यासाठी मालाड स्टेशनवर गेले होते. त्यावेळी मालाड पूर्वेत स्टेशनजवळ रिक्षावाल्याने कट मारल्यामुळे मनसे कार्यकर्ता आणि रिक्षावाल्याबरोबर बाचाबाची सुरू झाली. मालाड स्टेशनवर असलेले रिक्षा चालकाचा मित्र फेरीवाल्यांनी यावेळी गर्दी जमा करून दहा ते बारा लोकांनी मनसे कार्यकर्तावर हल्ला केला.
रिक्षा आणि फेरीवाल्यांच्या या हल्ल्यात मनसे कार्यकर्ता गंभीर जखमी झाला. त्याला जवळच्या ट्रामा केअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला मात्र रात्री बारा वाजता मनसे कार्यकर्त्याची मृत्यू झाली. या हल्ला प्रकरणी दिंडोशी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून आरोपीचे शोध घेतला जात आहे.
मनसे कडून पोलिसांवर आरोप करण्यात आला आहे ज्या पद्धतीने बाबा सिद्दिकी यांच्या हत्याप्रकरणी पोलिसांनी तत्परता दाखवून दोन आरोपींना अटक केली आहे तर इतर आरोपीचे शोध घेत आहेत. त्याच पद्धतीने पोलिसांनी मनसे कार्यकर्तावर हल्ला प्रकरणी तपास वेगाने केली पाहिजे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.