Baba Siddiqui Case: बाबा सिद्दिकी हत्या प्रकरण; मारेकऱ्यांचे पुणे कनेक्शन, आरोपी करायचा भंगार गोळा करण्याचा व्यवसाय

Baba Siddiqui Death Case: बाबा सिद्धिकी यांच्यावर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांचं पुणे कनेक्शन समोर आल्याची माहिती समोर आलीय. गेल्या काही दिवसांपासून ते पुण्यात राहत होते, अशी माहिती हाती आलीय.
Baba Siddiqui Case: बाबा सिद्दिकी हत्या प्रकरण; मारेकऱ्यांचे पुणे कनेक्शन, आरोपी करायचा भंगार गोळा करण्याचा व्यवसाय
Published On

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्धिकी यांच्या हत्या प्रकरणी गुन्हे शाखेने दोन शुटर्सला अटक केलीय. या आरोपींची ओळख पटली असून एकाचे नाव गुरमैल बलजीत सिंह वय २३ असून तो हरियाणाचा रहिवाशी आहे. तर दुसरा आरोपी युपीच्या बहराइच येथील असून त्याचे नाव धर्मराज राजेश कश्यप असून त्याचे वय १९ आहे. तर तिसरा आरोपी अद्याप फरार आहे. त्याचे नाव शिव कुमार गौतम उर्फ शिवा (२०) असून तोही बहाराइच येथील राहणारा आहे. दरम्यान बाबा सिद्धिकी प्रकरणाचं पुणे कनेक्शन समोर आले आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, पोलिसांच्या अटकेत असलेला १९ वर्षाचा आरोपी धर्मराज कश्यप हा काही दिवसांपासून पुण्यात राहत असल्याची बाब समोर आलीय. विशेष म्हणजे धर्मराज कश्यपनेच बाबा सिद्दिकीवर गोळीबार केला होता. कश्यप हा मूळचा उत्तर प्रदेश राज्यातील रहिवाशी आहे. तर काही दिवसांपासून धर्मराज पुण्यात काम करत होता. तो पुण्यात स्क्रॅप गोळा करण्याचं काम करत होता. दरम्यान इतर आरोपीच्या संपर्कात धर्मराज कसा आला याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.

Baba Siddiqui Case: बाबा सिद्दिकी हत्या प्रकरण; मारेकऱ्यांचे पुणे कनेक्शन, आरोपी करायचा भंगार गोळा करण्याचा व्यवसाय
Lawrence Bishnoi Gang: ७०० शूटर, सहा देशात दहशत, बाबा सिद्दीकींच्या हत्येचा मास्टरमाईंड; वाचा बिश्नोई गँगची A TO Z स्टोरी

धर्मराज कश्यप आणि शिवकुमार उर्फ ​​शिवा गौतम हे दोघे मजुरीचे काम करण्यासाठी पुण्यात आले होते. शिवा पुण्यात एका भंगार विक्रेत्याकडे ५ ते ६ वर्षे काम करत होता. शिवानेही काही महिन्यांपूर्वी धर्मराजला पुण्याला कामानिमित्त बोलावले होते. सुपारी देणाऱ्या व्यक्तीने गुरमेलची शिवा आणि धर्मराज यांच्याशी ओळख करून दिली होती. मात्र दोघेही पुण्याहून मुंबईत कसे पोहोचले, याचा तपास गुन्हे शाखा करताहेत.

मुंबई पोलिसांनी बाबा सिद्दीकी यांच्या हत्या कॉन्टॅक्ट किलिंग मधून करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलंय. दरम्यान आता गुन्हे शाखा ही घटना घडवून आणणाऱ्या गोळीबाराच्या सूत्रधाराचा शोध घेतायेत. त्यांच्या गुन्हेगारी इतिहासासाठी मुंबई गुन्हे शाखेने उत्तर प्रदेश पोलिसांशी संपर्क साधला असता, दोन्ही आरोपींविरुद्ध जिल्ह्यात कोणताही गुन्हा दाखल नव्हता. धर्मराज राजेश कश्यप आणि शिवकुमार गौतम उर्फ ​​शिवा बहराइच जिल्ह्यातील कैसरगंज पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या गंडारा शहरातील रहिवासी आहेत.

Baba Siddiqui Case: बाबा सिद्दिकी हत्या प्रकरण; मारेकऱ्यांचे पुणे कनेक्शन, आरोपी करायचा भंगार गोळा करण्याचा व्यवसाय
Baba Siddiqui Firing: मुलाच्या कार्यालयाबाहेरच मारेकऱ्यांनी झाडल्या गोळ्या, असा घडला बाबा सिद्धिकींवरील गोळीबारचा थरार

मात्र हरियाणाचा रहिवासी असलेल्या गुरमेल बलजीतवर यापूर्वीच खुनाचा गुन्हा दाखल आहे. आरोपी गुरमेलचे आई-वडील यांचा आधीच मृत्यू झालाय. पण त्याची आजी फुली देवी जिवंत आहे. तो एक लहान सावत्र भाऊ त्याच्या आजीसोबत राहतो. २०१९ मध्ये गुरमेलने त्याच्या मोठ्या भावाची सुरा भोसकून हत्या केली होती.

दरम्यान, बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारणाऱ्या फेसबुक पोस्टची केंद्रीय यंत्रणांकडून चौकशी सुरू झालीय. फेकबुक पोस्ट करणारा शुबू लोणकर हा मूळ शुभम रामेश्वर लोणकर आहे का? याचा तपास तपास केल्या जातं आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुबू लोणकर ज्यांचे हे फेसबुक हँण्डल आहे. त्याचे खरे नाव शुभम लोणकर असू शकते. शुभम लोणकर हा मूळ अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील रहिवासी असल्याच सांगितलं जातंय. दरम्यान आता अकोला पोलिसांनी देखील तपास सुरू केलाय.

अकोला पोलीस दलातील आयपीएस अनमोल मित्तल यांचे पथक अकोट तालुक्यातील निवरी बुद्रुक गावात शुभम लोणकर यांच्या घरी पोहोचले होते. मात्र शुभम लोणकर यांच्या घराला कुलूप लावलेल दिसून आले. त्याच्या घरी कोणीही नसल्याच पोलिसांना आढळून आलंय. विशेष म्हणजे या आधीही शुभम लोणकरवर अकोला पोलिसांनी कारवाई करत तब्बल तीन पिस्तूल आणि ११ जिवंत काडतूस त्याच्याकडून जप्त केल्या होत्या. शुबू लोणकर हा लॉरेन्स बिश्नोई गँगचा जवळचा असल्याचं म्हटल्य जातंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com