Lawrence Bishnoi Gang: ७०० शूटर, सहा देशात दहशत, बाबा सिद्दीकींच्या हत्येचा मास्टरमाईंड; वाचा बिश्नोई गँगची A TO Z स्टोरी

Lawrence Bishnoi Story: अभिनेता सलमान खानच्या घरावरील गोळीबार हत्या प्रकरणातील आरोपी अनुज थापर याचा कारागृहात मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात केल्याचे बिश्नोई गँगने सांगितले आहे.
Lawrence Bishnoi Gang:  ७०० शूटर, सहा देशात दहशत, बाबा सिद्दीकींच्या हत्येचा मास्टमाईंड; वाचा बिश्नोई गँगची A TO Z स्टोरी
Lawrence Bishnoi Story:Saamtv
Published On

Baba Siddique Death: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते, मंत्री बाबा सिद्दीकी यांची मुंबईमध्ये गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येने राजकीय वर्तुळासह सिने जगतातही खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आता महत्वाची अपडेट समोर आली असून लॉरेन्स बिश्नोई गँगने या हत्येची जबाबदारी घेतली आहे. अभिनेता सलमान खानच्या घरावरील गोळीबार हत्या प्रकरणातील आरोपी अनुज थापर याचा कारागृहात मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात केल्याचे बिश्नोई गँगने सांगितले आहे.

Lawrence Bishnoi Gang:  ७०० शूटर, सहा देशात दहशत, बाबा सिद्दीकींच्या हत्येचा मास्टमाईंड; वाचा बिश्नोई गँगची A TO Z स्टोरी
Sharad Pawar: ठरलं तरं! या दिवशी होणार विधानसभा निवडणुकांची घोषणा? शरद पवारांनी वार अन् तारीखही सांगितली!

पंजाबमध्ये जन्म..

पंजाबच्या फिरोजपूर12 फेब्रुवारी 1993 रोजी जन्मलेला लॉरेन्स बिश्नोईचा जन्म झाला. लॉरेन्सने पंजाब विद्यापीठातून एलएलबी पूर्ण केले आहे. 2009 मध्ये शिक्षणादरम्यान तो पंजाब विद्यापीठाच्या एका विद्यार्थी संघटनेत सामील झाला. याच काळात तो विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्ष गोल्डी ब्रार याच्याशी भेट झाली. गोल्डीला भेटल्यानंतर आणि विद्यापीठाच्या विद्यार्थी राजकारणात सामील झाल्यानंतर बिष्णोई गुन्हेगारीच्या जगाकडे वळला. लॉरेन्स सध्या दिल्लीच्या तिहार तुरुंगातील तुरुंग क्रमांक 8 मधील उच्च सुरक्षा वॉर्डमध्ये कैद आहे. लॉरेन्स बिश्नोईवर खून आणि खंडणीचे दोन डझन गुन्हे दाखल आहेत.

गुन्हेगारीमध्ये प्रवेश..

कॅनेडियन पोलीस आणि भारतीय एजन्सी शोध घेत असलेल्या सतविंदर सिंग उर्फ ​​गोल्डी ब्रारच्या माध्यमातून बिश्नोई टोळी काम करते. बिश्नोई टोळीत 700 हून अधिक शूटर आहेत, त्यापैकी 300 पंजाबशी संबंधित आहेत. बिश्नोई आणि गोल्डी ब्रार यांचे फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूबच्या माध्यमातून अपलोड करण्यात आले. बिष्णोईला न्यायालयात हजर केले जात असताना, फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करून अशा प्रकारे टोळीचा प्रचार करण्यात आला. बिष्णोई टोळीने 2020-21 पर्यंत खंडणीतून कोट्यवधी रुपये कमावले आणि तो पैसा हवालाद्वारे परदेशात पाठवला गेला.

Lawrence Bishnoi Gang:  ७०० शूटर, सहा देशात दहशत, बाबा सिद्दीकींच्या हत्येचा मास्टमाईंड; वाचा बिश्नोई गँगची A TO Z स्टोरी
Sanjay Raut: 'आता राजीनामा नको, गृहमंत्र्यांना हाकला...' संजय राऊत देवेंद्र फडणवीसांवर संतापले; CM शिंदेंवर गंभीर आरोप

११ राज्ये ६ देशात दहशत..

लॉरेन्स बिश्नोईचे गुन्हेगारी साम्राज्य भारतातील 11 राज्ये आणि 6 देशांमध्ये पसरले आहे. एनआयएच्या म्हणण्यानुसार, एकेकाळी बिश्नोईची टोळी फक्त पंजाबपुरती मर्यादित होती, पण आपल्या धूर्त मनाने आणि त्याचा जवळचा मित्र गोल्डी ब्रार याने हरियाणा, दिल्ली आणि राजस्थानच्या टोळ्यांशी हातमिळवणी करून मोठी टोळी तयार केली. बिश्नोई टोळी आता उत्तर भारत, पंजाब, उत्तर प्रदेश, हरियाणा, महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान आणि झारखंडमध्ये पसरली आहे. सोशल मीडिया आणि इतर विविध मार्गांनी तरुणांना टोळ्यांमध्ये भरती केले जाते. लॉरेन्स बिश्नोईचे साम्राज्य यूएसए, अझरबैजान, पोर्तुगाल, यूएई आणि रशियापर्यंत पसरले आहे.

तरुणांना कॅनडा किंवा त्यांच्या आवडीच्या देशात स्थलांतरित करण्याचे आमिष दाखवून टोळ्यांमध्ये भरती केले जाते. एनआयएच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानमध्ये राहणारा खलिस्तानी दहशतवादी हरविंदर सिंग रिंडा हा पंजाबमध्ये टार्गेट किलिंग आणि गुन्हेगारी कारवाया करण्यासाठी बिश्नोई टोळीच्या शूटर्सचा वापर करतो. काही दिवसांपूर्वी एनआयएने लॉरेन्स बिश्नोई, गोल्डी ब्रार यांच्यासह एकूण 16 गुंडांच्या विरोधात UAPA अंतर्गत कोर्टात आरोपपत्र दाखल केले होते.

Lawrence Bishnoi Gang:  ७०० शूटर, सहा देशात दहशत, बाबा सिद्दीकींच्या हत्येचा मास्टमाईंड; वाचा बिश्नोई गँगची A TO Z स्टोरी
Sambhajinagar Crime : महापालिका रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना चोरांची बेदम मारहाण; हॉस्पिटलमध्ये येण्यास मज्जाव केल्याचा राग

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com