बैतूल जिल्ह्यातील गावात तिहेरी हत्येची धक्कादायक घटना.
30 वर्षीय युवकावर आई-वडील आणि भावाची हत्या केल्याचा आरोप.
पाळीव मांजराचा देखील मृत्यू; भाचा गंभीर जखमी.
मध्य प्रदेशच्या बैतूल जिल्ह्यातील सानवागा गावात राहणाऱ्या एका ३० वर्षीय मुलाने आई-वडिलांची आणि धाकट्या भावाची हत्या केली. इतकेच नाही तर त्याने आई-बापासह घरातील पाळीव मांजराचाही जीव घेतला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडवून दिली आहे. दीपक धुर्वे असं हैवान मुलाचं नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी घटनास्थळावर दीपक धुर्वेला अटक केली. मृतांची ओळख पटली आहे त्याचे वडील राजू उर्फ हंसू धुर्वे (५५), आई कमलती धुर्वे (४०) आणि धाकटा भाऊ दिलीप धुर्वे अशी त्यांची नावे आहेत. दीपकने आपल्या ५ वर्षाच्या पुतण्याला गंभीरित्या जखमी केले आहे. मुलाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. जखमी झालेल्या पाच वर्षांच्या प्रशांत पार्टे या मुलावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
गुरुवारी दुपारी घराचा दरवाजा सकाळपासून उघडा होता, घरातून आतून कोणताही आवाज येत नसल्यानं शेजाऱ्यांना वेगळाच संशय आला. शेजाऱ्यांनी घरातील लोकांना आवाज दिला. पुन: पुन्हा आवाज दिल्यानंतरही कोणीच प्रतिसाद न दिल्यानं शेजाऱ्यांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. त्यावेळी दीपक हा तिघांच्या मृतदेहाशेजारी बसलेला होता. जमिनीवर आणि घराच्या भिंतीवर रक्ताचे शिंतोडे उडालेले होते.
दरम्यान घरात एक मेलेली मांजर सुद्धा आढळलीय. या घटनेदरम्यान दीपकने मांजरीचीही हत्या केली असावी, असा पोलिसांना संशय आहे. दीपकचे इतर नातेवाईकांनी सांगितले की, दीपक हा एक हुशार विद्यार्थी होता. त्याने बारावीत प्रथम क्रमांक मिळवला होता. शिक्षण पूर्ण केल्यानंतर तो घरीच होता आणि सरकारी नोकरीची तयारी करत होता. त्याने सीआरपीएफसाठी अर्ज केला होता, परंतु त्याची निवड झाली नाही.
वारंवार अपयश आल्यामुळे तो अस्वस्थ होत होता, असेही नातेवाईकांनी माहिती दिली आहे. शेजाऱ्यांनी पोलिसांना सांगितले की, दीपक गेल्या चार-पाच वर्षांपासून मानसिक आरोग्याच्या समस्यांसाठी उपचार घेत होता आणि वैद्यकीय सल्ला घेतल्यानंतर तो अलीकडेच नागपूरहून परतला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.