Crime News: भाजप नगरसेवकाच्या तिसऱ्या पत्नीवर चाकू हल्ला; रिक्षात बसताना मुलाने डाव साधला
मंदसौरमध्ये भाजप नगरसेवकाच्या पत्नीची चाकूने हत्या
मृत महिलेचं नाव रुबिना; शाहिद मेओ यांची तिसरी पत्नी
ऑटो रिक्षात बसताना दुचाकीवरून आलेल्या तरुणांचा हल्ला
मध्य प्रदेशातील मंदसौरमध्ये गुरुवारी संध्याकाळी एक धक्कादायक घटना घडली. भाजप नगरसेवकाच्या पत्नीची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली आहे. मृत महिलेचे नाव रुबिना असल्याचं सांगितलं जात आहे. वॉर्ड क्रमांक १५ मधील भाजप नगरसेवक शाहिद मेओ यांची तिसरी पत्नी होती. हाती आलेल्या माहितीनुसार रुबिना या ऑटो रिक्षात चढत होत्या त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी त्याच्यावर हल्ला केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुबिना या माहेराहून आपल्या भाड्याच्या घरी परतत होत्या. ऑटो-रिक्षा तिच्या घराजवळ येताच दुचाकीवरून दोन तरुण आले. त्यापैकी एकाने रुबिनाच्या पोटात, छातीत आणि डोक्यात चाकूने वार केले. चाकू हल्ला केल्यानंतर ते दोन्ही संशयित घटनास्थळावरून फरार झाले. नगरसेवक शाहिद यांनी रुबिना यांना ताबडतोब जिल्हा रुग्णालयात नेले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
घटनेच्या दुसऱ्याच दिवशी पोलिसांना या प्रकरणाचा तपास करताना मोठे यश मिळालंय. नगरसेवकाचा मुलगा साहिल आणि त्याच्या एका साथीदाराला पोलिसांनी अटक केली आहे. मंदसौरचे एएसपी तेर सिंह बघेल म्हणाले की, शाहिद यांनी सुमारे ७ महिन्यांपूर्वी रुबिनासोबत तिसरे लग्न केले होते. त्यांचा मुलगा साहिल या लग्नावर नाराज होता.
या कौटुंबिक तणावामुळे त्याने ही हत्या केली असल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिसांनी सांगितले की, घटनेच्या वेळी परिसरात वीज नव्हती, त्यामुळे जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये ही घटना रेकॉर्ड होऊ शकली नाहीये. परंतु आजूबाजूच्या परिसरातील फुटेज तपासण्यात आले असून यात साहिलचा सहभाग असल्याचे पुरावे पोलिसांना मिळाले आहेत. साहिल आणि त्याच्या शेजाऱ्याला हत्येच्या प्रकरणात अटक करण्यात आलीय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.
