Mumbai Crime News: शौचलयात गेली अन् हाताची नस कापली; विद्यार्थिनीचं कृत्य पाहून पोलीसही चक्रावले

Mumbai Shocking News: भायखळा रेल्वे स्थानकावरील महिलांच्या सार्वजनिक शौचालयात एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हाताची नस कापून मुलीने आपला जीव देण्याचा प्रयत्न केला.
Mumbai Shocking  News:
Police personnel at Byculla railway station after a student was rescued from a suicide attempt inside a public toilet.Saam Tv
Published On
Summary
  • भायखळा रेल्वे स्थानकावरील महिलांच्या शौचालयात धक्कादायक घटना

  • मानसिक तणावातून विद्यार्थिनीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती

  • प्रवाशांच्या सतर्कतेमुळे आणि पोलिसांच्या मदतीने जीव वाचला

मुंबईत भायखळा रेल्वे स्थानकावरील महिलांच्या सार्वजनिक शौचालयात एका विद्यार्थिनीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. मानसिक तणावामुळे विद्यार्थिनीने हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मोठा रक्तस्राव झाला होता, पण सुदैवाने मुलीचा जीव बचावला आहे.

Mumbai Shocking  News:
Pune Crime News : पहिल्या मजल्यावर फ्लॅटमध्ये सुरू होता भयंकर प्रकार; धाड टाकल्यानंतर रूममधलं दृश्य बघून सगळेच हादरले

मिळालेल्या माहितीनुसार, भायखळा रेल्वे स्थानकावरील महिलांच्या शौचालयात एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीने आत्महत्येचा प्रयत्न केला. ही मुलगी मानसिक तणावाखाली होती. त्यातून तिने टोकाचं पाऊल उचलतं हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. भायखळा रेल्वे स्थानकावरील महिलांच्या सार्वजनिक शौचालयात ही विद्यार्थीिनी फ्रेश होण्यासाठी गेली. मात्र खूप वेळानंतरही ती बाहेर आली नाही. त्यावेळी इतर प्रवाशी महिलांनी दरवाजा ठोठावून तसेच तिला आवाज दिला. पण तिने कोणताच प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे शौचालयात उपस्थित एका महिलेने ही माहिती तातडीने पोलिसांना दिली.

Mumbai Shocking  News:
Crime news : बंद खोलीत ३८ महिला आणि ४३ पुरुष, पोलिसांची धाड पडली, धक्कादायक प्रकार उघड; ८१ जण सापडले कचाट्यात

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दरवाजा तोडला. त्यावेळी आतली यावेळी विद्यार्थिनीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पीडितेला तात्काळ उपचारांसाठी सेंट जाॅर्ज रुग्णालयात दाखल केला. सध्या पीडित मुलीची प्रकृती स्थिर असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच मानसिक तणावातून तिने हे पाऊल उचलल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

शिक्षकाची विद्यार्थिनीवर पडली वाईट नजर

लातूर शहरात एका शिक्षकाने विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची घटना घडलीय. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. या घटनेने मुलींच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेत. .

मिळालेल्या माहितीनुसार, लातूरमधील ट्यूशन एरिया परिसरातील एका खासगी क्लासेसमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. एक विद्यार्थिनी ट्युशनसाठी संबंधित शिक्षकाच्या क्लासमधील हॉलमध्ये आली. यावेळी शिक्षकाने हॉलमधील एकांताचा गैरफायदा घेत तिच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप संबंधित विद्यार्थिनीनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com