ग्वाल्हेरमध्ये वकिलाची गोळ्या झाडून हत्या
दिवसाढवळ्या वकिलावर हॉटेलबाहेर गोळीबार
जमिनीच्या वादातून वकिलाची हत्या झाल्याचे उघड
शरीरात ३ गोळ्या घुसल्याने जागीच मृत्यू
मध्य प्रदेशमध्ये वकिलाची गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली. मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेर जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली. सोमवारी दुपारी भितरवार शहरात एका हॉटेलबाहेर वकिलावर ३ अज्ञातांनी गोळ्या झाडल्या. या गोळीबारामध्ये ६० वर्षीय वकील रतन सिंह यादव यांचा जागीच मृत्यू झाला. या गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला. या हत्याकांडानंतर परिसरात दहशतीचे वातावरण आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी सांगितले की, हल्लेखोरांनी वकील रतन सिंग यादव यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. वकिलाच्या शरीरात ३ गोळ्या घुसल्या. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत असल्याने ते जागीच कोसळले. घटनेनंतर लगेचच स्थानिक नागरिकांनी आणि कुटुंबीयांच्या मदतीने त्यांना गंभीर जखमी अवस्थेत उपचारासाठी ग्वाल्हेर शहरातील रुग्णालयात नेण्यात आले. पण डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषीत केले.
वकिलाची हत्या केल्यानंतर तिन्ही आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. पोलिस सध्या या हत्याकांडाचा तपास करत आहेत. या हत्येचा संबंध एका जुन्या जमिनीच्या वादाशी असू शकतो असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पोलिस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की हत्या झालेल्या वकिलाचा काही व्यक्तींसोबत बऱ्याच काळापासून जमिनीचा वाद सुरू होता. याच पूर्ववैमनस्यातून हा गोळीबार झाला असावा असा संशय आहे. पोलिसांनी या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल केला असून संपूर्ण घटनेचा सखोल तपास करत आहेत.
हत्या झालेल्या वकिलाच्या कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले की, जमिनीच्या एका तुकड्यावरून रतन सिंग यांचा त्यांच्या काही नातेवाईकांशी जुना वाद होता. कुटुंबीयांना संशय आहे की, या हत्येमागे त्यांचाच हात आहे. दिवसाढवळ्या झालेल्या या हत्येमुळे स्थानिक वकील आणि रहिवाशांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता फरार हल्लेखोरांना पकडण्यासाठी पोलिस प्रशासनाने विशेष पथके तयार केली आहेत. पोलिसांनी सांगितले की, संभाव्य लपण्याच्या ठिकाणांवर छापे टाकले जात असून सर्व आरोपींना लवकरच अटक करून तुरुंगात पाठवले जाईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.