Mumbai CJP Protest : अभिनेत्री स्वरा भास्करच्या पतीला मुंबई पोलिसांनी घेतलं ताब्यात, Video पोस्ट करत म्हणाली "अतिशय लाजिरवाणी गोष्ट"

Mumbai CJP Protest Update News : मुंबईतील चैत्यभूमीवरील आंदोलनादरम्यान फहाद अहमद यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या घटनेनंतर स्वरा भास्करने सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करत मुंबई पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
SWARA BHASKAR REACTS AFTER FAHAD AHMAD DETAINED DURING CHAITYABHOOMI PROTEST IN MUMBAI
SWARA BHASKAR REACTS AFTER FAHAD AHMAD DETAINED DURING CHAITYABHOOMI PROTEST IN MUMBAI Saam tv
Published On
Summary
  • मुंबईतील चैत्यभूमीवर सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान फहाद अहमद यांना पोलिसांनी ताब्यात घेतले

  • स्वरा भास्करने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत पोलिसांच्या कारवाईवर तीव्र नाराजी व्यक्त केली

  • आंदोलनादरम्यान अनेक आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले

  • काही जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

  • या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

दिल्लीत जंतर मंतर येथे गेले २४ दिवस तरुणांचं आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाचे पडसाद महाराष्ट्रभर पाहायला मिळाले. मुंबईतील चैत्यभूमीवर देखील हजारोंच्या संख्येने आंदोलकांनी आंदोलन छेडले. या आंदोलनात अभिनेत्री स्वरा भास्करचा पती आणि राजकीय कार्यकर्ते फहाद अहमद देखील उपस्थित होते. या आंदोलनाने हिंसक वळण घेतल्याने अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच राजकीय कार्यकर्ते फहाद अहमद यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर वातावरण तणावपूर्ण झाले असून या घटनेचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.

सोमवारी संध्याकाळी स्वरा भास्करने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर या घटनेसंदर्भातील काही व्हिडीओ शेअर केले. एका व्हिडीओमध्ये पोलीस फहाद अहमद यांना घेऊन जाताना दिसत आहेत. या वेळी फहाद पोलिसांना “मला अटक का करत आहात?” असा प्रश्न विचारताना ऐकू येतो. हा व्हिडीओ दुपारी साडेचारच्या सुमारास रेकॉर्ड करण्यात आल्याचे स्वराने नमूद केले आहे.

SWARA BHASKAR REACTS AFTER FAHAD AHMAD DETAINED DURING CHAITYABHOOMI PROTEST IN MUMBAI
Hair Care Tips : केसांचे गळणे होईल कायमचे बंद! मेथी दाण्यांमध्ये 'ही' १ गोष्ट मिसळून लावा; एका आठवड्यात दिसेल जादू

व्हिडीओ शेअर करताना स्वराने मुंबई पोलिसांच्या कारवाईवर तीव्र नाराजी व्यक्त केली. “मुंबई पोलिसांनी चैत्यभूमीवरून फहाद अहमद आणि इतर आंदोलकांना ताब्यात घेतले असून त्यांना माहीम पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले आहे. लोकशाही व्यवस्थेसाठी ही अत्यंत दुर्दैवी आणि लाजिरवाणी घटना आहे,” असे तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले.

यापूर्वी शेअर केलेल्या आणखी एका व्हिडीओमध्ये फहाद पोलिसांच्या वाहनातून घटनेची माहिती देताना दिसत आहे. शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई होत असल्याचा आरोप करत त्यांनी समर्थकांना शांततेने आंदोलनस्थळी पोहोचण्याचे आवाहन केले. दरम्यान, आंदोलनादरम्यान काही आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले असून काही जण जखमी झाल्याचीही माहिती समोर आली आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com