Crime: प्रेमसंबंधाला विरोध, बापाने मुलीला संपवलं; आधी कीटकनाशक पाजलं नंतर...

Karnataka Crime: कर्नाटकमध्ये बापाने आपल्याच मुलीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. प्रेमसंबंधाला विरोध करत बापाने हे टोकाचे पाऊल उचलले. या घटनेमुळे कर्नाटकमध्ये खळबळ उडाली.
Crime: प्रेमसंबंधाला विरोध, बापाने मुलीला संपवलं; आधी कीटकनाशक पाजलं नंतर...
Karnataka CrimeSaam tv
Published On

कर्नाटकच्या कुलबुर्गी जिल्ह्यामध्ये मन हेलावून टाकणारी घटना घडली. एका व्यक्तीने आपल्या १८ वर्षांच्या मुलीची निर्घृण हत्या केली. दुसऱ्या जातीतील मुलावर प्रेम करते यामुळे संतप्त झालेल्या बापाने हे धक्कादायक कृत्य केले. मृत मुलीचे नाव कविता होते. ती नर्सिंगचे शिक्षण घेत होती. कविता मेलकुंडा गावामध्ये आपल्या कुटुंबीयांसोबत राहत होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कविताचे वडील शंकरने २८ ऑगस्ट रोजी तिची गळा दाबून हत्या केली. मुलीच्या हत्येनंतर शंकरने दावा केला होता की कविताने आत्महत्या केली. त्यानंतर त्याने गावातच तिचे अंत्यसंस्कार केले. यानंतर फरहताबाद पोलिस ठाण्याला प्रकरण दडपल्याबद्दल माहिती मिळाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत कारवाई करत आरोपीला अटक केली. तर शंकरच्या दोन नातेवाईकांना पोलिसांनी प्रकरण दाबल्याच्या आरोपाखाली ताब्यात घेण्यात आले आहे.

Crime: प्रेमसंबंधाला विरोध, बापाने मुलीला संपवलं; आधी कीटकनाशक पाजलं नंतर...
Thane Crime: ठाण्यात शिंदेंच्या कार्यकर्त्याची हत्या, कारच्या चाकाखाली चिरडलं; थरकाप उडवणारा CCTV व्हिडिओ

शंकरला ५ मुली आहेत. त्यामधील कविताचे गावातील एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. हा तरुण दुसऱ्या जातीचा आहे. कविता लिंगायत जातीतून होती. तर तिचा प्रियकर दुसऱ्या जातीतून होता. कविताच्या कुटुंबीयांचा या नात्याला विरोध होता. कविताच्या कुटुंबीयांना या प्रेमसंबंधाविषयची माहिती ३ महिन्यांपूर्वीच कळाली होती. शंकरला आपल्या मुलीचे प्रेमसंबंध मान्य नव्हते. त्यामुळे त्याने कविताला त्या मुलासोबत राहू नको असे सांगितले होते. पण कविताने वडिलांना नकार दिला होता.

Crime: प्रेमसंबंधाला विरोध, बापाने मुलीला संपवलं; आधी कीटकनाशक पाजलं नंतर...
Crime: गरोदर गर्लफ्रेंडची हत्या, सीरियल किलर निघाला बॉयफ्रेंड; आरोपीने चौघांचा जीव घेतला

त्यानंतर संतप्त झालेल्या शंकरने कविताच्या तोंडात कीटकनाशक टाकून तिची हत्या केली. त्यानंतर त्याने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी कविताने आत्महत्या केल्याचा दावा केला. त्यानंतर त्याने २५० गावकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या भावाच्या जमिनीवर कविताचे अंत्यसंत्कार केले. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत पुरावे गोळ्या केले. फॉरेन्सिक टीमने देखील घटनास्थळी धाव घेत पुरावे गोळा करून घेतले. त्यानंतर पोलिसांनी शंकरची कसून चौकशी केली तर त्याने कविताची गळा दाबून हत्या केली असल्याचे कबुल केले. यानंतर पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.

Crime: प्रेमसंबंधाला विरोध, बापाने मुलीला संपवलं; आधी कीटकनाशक पाजलं नंतर...
Nashik Crime : मैत्रिणीची छेड काढल्याचा संशय; भिकाऱ्याच्या डोक्यात दगड घालून केली हत्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com