

संशयातून एका महिलेची हत्या झाल्याची घटना समोर आली.
कौटुंबिक वाद आणि संशय हे या घटनेमागील प्रमुख कारण
पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
पती-पत्नीचं नातं हे नाजूक धाग्यांनी बांधले गेले असते. या नात्यात वादाची ठिगणी पडली तर त्याचा नाते तुटायला वेळ लागत नाही. जर दोघांपैकी एकाच्या मनात संशयाचं भूत शिरलं तर काही केल्या निघत नाही. अनेकवेळा तर संशयामुळे सुखी संसाराची राखरांगोळी झालेली उदाहरण आपण पाहिली आहेत. तिरुवनंतपुरम येथेही एका सुखी संसाराला संशयाच्या भूत पछाडलं आणि चार मुलांनी आपल्या आईला डोळ्यात देखत मरताना पाहिलं.
केरळची राजधानी तिरुवनंतपुरममध्ये एका ३६ वर्षीय हसिना हिची तिच्या नवऱ्यानं गळा चिरून तिची हत्या केली. बायकोचा जीव घेतल्यानंतर आरोपी नवरा तेथून पळून गेला. आरोपी नवऱ्यानं जेव्हा त्या पत्नीवर हल्ला केला तेव्हा त्याची चार मुलेही घरात होती. त्यांनी आपल्या आईला रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं पाहिलं.
हाती आलेल्या माहितीनुसार, दोन्ही नवरा-बायकोमध्ये काही कारणावरू न वाद झाला होता. त्या वादातून नवऱ्याच्या संतापाचा पारा चढला आणि त्याने पत्नीवर प्राणघातक हल्ला केला. यात पत्नीचा जागीच मृत्यू झाला. आरोपी पतीचं नाव सुरेश आहे. हत्येची घटना ज्यावेळी घडली त्यावेळी घरात त्यांची चार मुलेही होती. आईला रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं पाहून चारही मुलं बिधरली. काय करावं त्यांना कळत नव्हतं.
स्थानिक लोकांना जेव्हा या घटनेची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी पोलिसांना पाचारण केलं. पोलीस जेव्हा घटनास्थळी पोहोचले त्यावेळी हसिनाचा नवरा सुरेश तेथून पळून गेला होता. दरम्यान पोलिसांनी पंचनामा केला असून आरोपी नवऱ्याचा शोध घेत आहे. मोबाईल फोन आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे त्याच्या ठिकाणाचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. प्राथमिक तपासात पती-पत्नीमध्ये दीर्घकाळापासून कौटुंबिक वाद असल्याचे समोर आले आहे. मात्र हत्येमागील नेमका हेतू जाणून घेण्यासाठी पोलीस कुटुंबीय आणि स्थानिक रहिवाशांची चौकशी करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.