

रांजणगाव परिसरातील लॉजवर एटीएस आणि पोलिसांनी संयुक्त धाड टाकली.
कारवाईदरम्यान ७ पीडित महिलांची सुटका
एका आरोपीला अटक करण्यात आली असून दुसरा आरोपी फरार
सागर आव्हाड, साम प्रतिनिधी
पुणे-नगर महामार्गावरील कारेगाव (ता. शिरूर) येथील एका फर्निचर दुकानाशेजारील एका लॉजवर दहशतवाद विरोधी शाखा (ATS) व रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी संयुक्त छापा टाकून मोठी कारवाई केली. आज झालेल्या या कारवाईत वेश्या व्यवसायातून ७ पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. त्यापैकी ३ महिला बांगलादेशी असल्याचे निष्पन्न झाले आहे.
याप्रकरणी पोलिसांनी लुतफ्फर मुज्जमलहक शेख (वय ४५, रा. पश्चिम बंगाल) याला अटक केली असून फरार आरोपी बबलू साहू (रा. ओडिशा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधीक्षक संदीप गिल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक भूषण माने व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. सुटका केलेल्या महिलांची रवानगी सुधारगृहात करण्यात आली आहे.
कारेगाव तालुका शिरूर हद्दीतील नगर-पुणे हायवे रोडलगतच्या एका फर्निचर दुकानाच्या बाजुला असलेल्या लॉजिंगमध्ये दहशतवादी विरोधी शाखा व रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी संयुक्त छापा टाकून कारवाई केली आहे. ही कारवाई भुषण माने पोलीस उपअधिक्षक, पोलीस मुख्यालय, पुणे ग्रामीण यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे करण्यात आलेली आहे.
छापा कारवाईमध्ये १) लुतफ्फर मुज्जमलहक शेख वय ४५ वर्षे, मुळ रा. नालीताजल, ता. बाजीतपुर, थाना-धनियाखाली, जि.हुगली, पश्चिम बंगाल, सध्या रा. कारेगाव, ता. शिरूर, जि. पुणे २) बबलू साहु सध्या रा. कारेगाव, ता. शिरुर, जि. पुणे मुळ रा. उडीसा यांच्याविरुद्ध स्त्रिया आणि मुली अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर आरोपी हे महिलांच्या असहाय्यतेच्या फायदा घेवून त्यांना देहविक्री करण्यास भाग पाडत. पोलिसांनी ताब्यात घेण्यात आलेला आरोपी लुतफ्फर शेख याला गुन्ह्याचे कामी अटक करण्यात आली आहे. आरोपी बबलू साहु हा फरार असून त्याच्याविरुध्द यापूर्वी देखील अशाच आरोपाखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या छाप्याच्या कारवाईत एकूण ७ महिलांची पोलिसांनी सुटका केली असून त्यातील ३ महिला या बांगलादेशी असल्याचे निष्पन्न झाले आहे. पीडित महिलांना महिला सुधारगृह येथे सुरक्षेच्या दृष्टीने ठेवण्यात आलेले आहे. सदर पिडीत बांगलादेशी महिलांना कायदेशीर प्रक्रिया पुर्ण झाल्यावर परत बांग्लादेशामध्ये पाठविण्याची कारवाई सुरू करण्यात आलेली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.