

धुळ्यात दुहेरी हत्याकांडामुळे खळबळ उडाली.
महिलेचा गळा दाबून खून केल्याची कबुली आरोपीने दिली.
तरुणाचा मृतदेह निर्जनस्थळी आढळून आला.
भुषण अहिरे, साम प्रतिनिधी
नाशिकमधील अशोक खरात प्रकरणानंतर राज्यातील प्रकरणं समोर येऊ लागली आहेत. धुळ्यातील एका भोंदू बाबाच्या प्रकरणाने अख्खा जिल्हा हादरला आहे. भोंदूगिरीच्या पाठी लागल्याने एका व्यक्तीने दोघांचा जीव घेतल्याचं समोर आले आहे. या दुहेरी हत्याकांडाच्या घटनेने धुळे जिल्हा हादारला आहे.
साक्री तालुक्यातील वर्धाने आणि उभरांडी शिवारात एका महिलेचा आणि एका पुरुषाचा मृतदेह सापडला आहे. जयश्री काकुस्ते (वय 25) व अक्षय सोनवणे (वय 28) या तरुणाचा मृतदेह जैताने गावाजवळील एका निर्जनस्थळी आढळून आले. या हत्या प्रकरणी पोलिसांनी संशयित भोंदूच्या मुसक्या आवळल्या आहेत. भोंदू बाबा योगेश उर्फ भैय्या बापू खैरनार असं या आरोपीचे नाव आहे.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रायपूर आणि वर्धाने या गावादरम्यानच्या जंगल परिसरात महिलेचा मृतदेह आढळून आल्याची माहिती निजामपूर पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तेथील पंचनामा केल्यानंतर पोलिसांना मृतदेहाजवळ एका मोफेड दुचाकी मिळून आली. पोलिसांनी त्या दुचाकीवरून मृत महिलेची ओळख पटवण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली.
त्यानंतर पुण्यातील भोंदूबाबा योगेश उर्फ भैय्या बापू खैरनार याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची चौकशी केल्यानंतर त्याने जयश्री काकुस्ते (वय 25)हिचा गळा आवळून खून केल्याची कबुली दिली. दरम्यान जयश्री काकुस्ते हिच्या मृतदेहबरोबर पोलिसांना अक्षय सोनवणे नावाच्या युवकाचा मृतदेह ,सापडला होता. अक्षय सोनवणेचाही भोंदू बाबाने खून केला अशीही कबुली आरोपीने दिली.
आरोपीने अक्षयचा खून केल्यानंतर त्याचा मृतदेह स्वत:च्या गो-शाळेत जमिनीत पूरून ठेवला होता. या हत्याकांडाची पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर आरोपीने मृतदेहाची विल्हेवाट कशी आणि कुठे लावली याची माहिती दिली. आरोपी भोंदूबाबाने आपल्या गोशाळेच्या मागील बाजूच्या जमिनीत लपवून ठेवला असल्याची माहिती दिली. त्यानंतर निजामपूर पोलिसांनी तेथे जाऊन मृतदेह शोधून काढला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.