

उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यात पोलिसांनी एक एन्काऊंटर केलंय. अपहरण, बलात्कार आणि हत्येच्या एका प्रकरणासंदर्भात पोलिसांनी जिल्ह्यात मोठी कारवाई केली आहे. मल्लावन पोलीस ठाण्याच्या हद्दीत ५०,००० रुपयांचं बक्षीस असलेला आरोपी मेनूर उर्फ शेनूर उर्फ मेहनुद्दीन पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत सापडला. उपचारादरम्यान या आरोपीचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या घटनेत एसओजी प्रभारी राजेश कुमार हेदेखील जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी मल्लावन पोलीस ठाण्यात मूल बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलीस मुलाचा शोध घेत होते. तपासादरम्यान समोर आलं की, आरोपीने रविवारी मुलाची हत्या केली आणि ही घटना लपवण्यासाठी चोरीच्या सिम कार्डचा वापर करून कुटुंबाला फोन करून खंडणीची मागणी केली.
मंगळवारी मल्लावन परिसरातील एका शेतातून मुलाचा मृतदेह सापडला. त्यानंतर प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी विशेष पथकं तयार केली. लखनऊ रेंजच्या पोलीस महानिरीक्षकांनी मुख्य आरोपीच्या अटकेसाठी ५०,००० रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं.
बुधवारी आरोपी मल्लावन परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांच्या एका पथकाने परिसराला घेरलं. यावेळी आपल्याला अटक होऊ नये यासाठी आरोपीने पोलिसांवर गोळीबार केला. आरोपीने केलेल्या हल्ल्यात एसओजी प्रभारी राजेश कुमार जखमी झालेत. संरक्षणासाठी केलेल्या गोळीबारीत आरोपी जखमी झाला. पोलिसांनी जखमी अवस्थेतच आरोपीला अटक केली.
जखमी आरोपी आणि पोलीस अधिकाऱ्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी आरोपीला मृत घोषित केल. पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून एक चोरलेली मोटारसायकल, एक पिस्तूल, एक रिव्हॉल्वर, काडतुसं, एका मुलाचे ताईत, एक मोबाईल फोन आणि एक चोरलेले सिम कार्ड जप्त केले.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीवर विविध जिल्ह्यांमध्ये जवळपास गुन्हेगारी खटले दाखल आहेत. सध्या, पंचनामा, शवविच्छेदन आणि तपासणीसह सर्व कायदेशीर प्रक्रिया सुरू आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.