Truck tyre explosion: हवा तपासत असताना टायरचा अचानक स्फोट, ३७ वर्षीय चालकाचा जागीच मृत्यू

Nandurbar accident news: नंदुरबार जिल्ह्यात ट्रकच्या टायरचा भीषण स्फोट होऊन चालकाचा जागीच मृत्यू झाला. टायरची हवा तपासत असताना ही दुर्घटना घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
Nandurbar accident news
Nandurbar accident newsSAAM TV
Published On

नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा शहराजवळ आज सकाळी एक अतिशय दुर्दैवी आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. बायपास रोडवर उभ्या असलेल्या ट्रकच्या टायरची हवा तपासत असताना अचानक टायरचा भीषण स्फोट झाला आणि त्यात चालकाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडालीये.

मिळालेल्या माहितीनुसार, ३७ वर्षीय सानेश्वर दिलीप मिस्तरी असं मृत्यू झालेल्या चालकाचं नाव आहे. त्यांनी सिमेंट वाहतूक करणारा ट्रक घेऊन गुजरातहून आणला होता. ट्रक रिकामा करण्यापूर्वी त्यांनी नेहमीप्रमाणे टायरची तपासणी सुरू केली होती. मात्र, याच वेळी अचानक टायरचा जोरदार स्फोट झाला.

Nandurbar accident news
Crime News: पत्नीच्या चारित्र्यावर संशय, झोपेतच दिला इलेक्ट्रिक करंट; अपघात दाखवण्याचा कट फसला

दरम्यान हा स्फोट इतका तीव्र होता की, टायरमधील प्रचंड हवेच्या दाबामुळे सानेश्वर मिस्तरी यांना गंभीर इजा झाली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांना हा प्रकार पाहून धक्का बसला. काही क्षणांतच मोठी गर्दी जमली.

Nandurbar accident news
Mumbai death mystery: 'त्या' चौघांचा मृत्यू कलिंगडमुळे नाहीच; FDA च्या नव्या अहवालाने पेच अजूनच वाढला

कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर

सानेश्वर मिस्तरी हे कष्टकरी चालक म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. स्थानिक नागरिकांकडूनही या घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली जातेय.

पोलीस घटनास्थळी तातडीने दाखल

दरम्यान घटनेची माहिती मिळताच तळोदा पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू आहे. टायरचा स्फोट नेमका कशामुळे झाला, याचा शोध पोलीस घेत आहेत.

Nandurbar accident news
Mumbai death mystery: 'त्या' चौघांचा मृत्यू कलिंगडमुळे नाहीच; FDA च्या नव्या अहवालाने पेच अजूनच वाढला

मार्च महिन्यातही घडलेली अशीच घटना

मार्च महिन्यात देखील एक अशीच घटना उत्तर प्रदेशातून समोर आली होती. युपीच्या आजमगड जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली होती. त्यावेळी टायरमध्ये हवा भरत असताना अचानक टायरचा स्फोट झाला. या स्फोटाचा वेग इतका प्रचंड होता की, व्यक्ती हवेत उडाला आणि रस्त्यावर पडला होता. यावेळी त्याचा जागीच मृत्यू झाला होता.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com