नवऱ्याकडून हुंड्याची मागणी, रागाच्या भरात 4 महिने गरोदर कमांडो बायकोच्या डोक्यात घातलं डंबल अन्...

Pregnant Woman Murdered For Dowry In Delhi: दिल्लीमध्ये हुंड्याच्या मागणीसाठी चार महिन्यांच्या गरोदर महिला कमांडोची तिच्याच नवऱ्याने हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Last rites of Delhi Police commando Kajal, wrapped in the national flag, as family demands strict action against dowry-related crimes.
Last rites of Delhi Police commando Kajal, wrapped in the national flag, as family demands strict action against dowry-related crimes.Saam Tv
Published On

राजधानी दिल्लीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षात तैनात असलेल्या महिला कमांडो काजलची तिच्या पतीनेच हत्या केल्याचा आरोप आहे. काजल चार महिन्यांपासून गरोदर होती.

Last rites of Delhi Police commando Kajal, wrapped in the national flag, as family demands strict action against dowry-related crimes.
Shocking: ९ वीच्या विद्यार्थिनीचे अपरहण करून सामूहिक बलात्कार, मानसिक धक्क्यातून मुलीची आत्महत्या

मिळालेल्या माहितीनुसार, काजलचे दोन वर्षांपूर्वी अंकुरसोबत लग्नाची गाठ बांधली होती. या दोघांचे लव्ह मॅरेज होते. सुरुवातीला त्यांचा संसार व्यवस्थित सुरू होता. काही दिवसांनी त्यांच्यामध्ये हुंड्यावरून वाद सुरू झाले. तिच्याकडून गाडी आणि पैशाची मागणी केली जात होती. तिचा मानसिक आणि शारीरिक छळही केला जात होता.

Last rites of Delhi Police commando Kajal, wrapped in the national flag, as family demands strict action against dowry-related crimes.
Shocking : ४ तरुण अन् ४ तरुणी एकाच खोलीत नको त्या अवस्थेत; पोलिसांनी धाड टाकताच धक्कादायक प्रकार उघड

काजल 2022 मध्ये पोलीस दलात रुजू झाली होती. मेहनत आणि शिस्तीच्या जोरावर ती स्पेशल युनिटमध्ये तिची नियुक्ती झाली. 2023 मध्ये तिने संरक्षण मंत्रालयात लिपिक असलेल्या अंकुरसोबत लग्न केले. दोघेही उच्चशिक्षित आणि नोकरी करणारे होते. पण घरातील परिस्थिति हळूहळू बिघडू लागली. कुटुंबाने सांगितले की, काजलने आपल्या नवऱ्यापासून वेगळे राहण्याचा सांगितले. यावेळी तिच्या नवऱ्याने तिला मारहाण केली. गरोदर असून ती घरातील सर्व काम करत असायची.

Last rites of Delhi Police commando Kajal, wrapped in the national flag, as family demands strict action against dowry-related crimes.
Death News: साध्वी प्रेम बैसा यांचा मृत्यू; व्हायरल व्हिडिओ, ब्लॅकमेलिंग की इंजेक्शन...? चार तासांनंतर सापडली सुसाईड नोट

लोखंडी डंबलने काजलवर हल्ला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 जानेवारी 2026 रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास अंकुरने काजलवर लोखंडी डंबलने हल्ला केला. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आली. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. सुरुवातीला हत्येचा प्रयत्न या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला. यानंतर कलम अधिक वाढवून हत्या केल्याचे लावण्यात आले. पोलिसांनी नराधम नवऱ्याच्या मुसक्या आवळल्या आहे.

काजलचे वडील आणि भावाने सांगितले की ही एक फक्त एका महिलेची हत्या नसून आई आणि तिच्या मुलाची हत्या आहे. हरियाणाच्या सोनीपत जिल्ह्यातील गनौर या काजलच्या मूळ गावी संतापाची लाट पसरली आहे. संपूर्ण गावाला ज्या मुलीचा गर्व होता त्या मुलीचा मृतदेह तिरंग्यामध्ये लपेटून आला. शासकीय इतमामात तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी तिच्या कुटुंबाने टाहो फोडला. या घटनेमुळे पुन्हा एकदा हुंडा घेणाऱ्यांच्या प्रवृत्तीबद्दल कठोर पाऊले उचलावी अशी मागणी जोर धरत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com