महिला वकिलाने पुलावरून उडी मारून संपवले आयुष्य; मुलीचा जन्मदात्या बापावर गंभीर आरोप

Delhi Woman Lawyer End Life Case Full Details: दिल्लीतील हैदरपूर फ्लायओव्हरवरून 42 वर्षीय महिला वकिलाने उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कुटुंबीयांनी पतीवर खूनाचा गंभीर आरोप केला असून पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.
Haiderpur flyover incident lawyer death investigation
Haiderpur flyover incident lawyer death investigationsaam tv
Published On

राजधानी दिल्लीतील हैदरपूर येथील पुलावरून एका 42 वर्षीय महिला वकिलाने उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी घडली. या प्रकरणात पोलिसांनी तिच्या पतीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी सुमारे 1 वाजण्याच्या सुमारास महिला आपल्या घरातून बाहेर पडली होती. हैदरपुर फ्लायओव्हर ओलांडत असताना दोघांनी गाडी थांबवली आणि त्यांच्यात वाद सुरू झाला.

Haiderpur flyover incident lawyer death investigation
Cyber Crime News : Telegram Task Scamचा पर्दाफाश; कोट्यवधींची सायबर फसवणूक, खार पोलिसांची मोठी कारवाई

तिथेच उपस्थित असलेल्या एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, दोघांमध्ये जोरदार भांडण होत असल्याचे पाहिले. काही वेळाने महिलेने संतप्त होऊन थेट पुलावरून उडी मारली. दरम्यान मृत महिलेच्या कुटुंबीयांनी गंभीर आरोप करत तिच्या नवऱ्याने पुलावरून ढकलून दिल्याचा दावा केला आहे. माझ्या आईने आत्महत्या केलेली नाही, माझ्या वडिलांनीच तिची हत्या केली आहे. ते आईला नेहमी मारहाण करत असे. तसेच आईला बाहेर काम होते, तेव्हा वडिलांनी तिला सोडण्याचा बहाणा करून नेले आणि वादाच्या वेळी तिला ढकलले, असा आरोप महिलेच्या मुलीने केला.

Haiderpur flyover incident lawyer death investigation
Shocking : भयंकर! बायको-पोरांसह ६ जणांची हत्या, आरोपीनं अख्ख्या कुटुंबाला संपवलं, धक्कादायक कारण आले समोर

पोलिसांनी कुटुंबीयांच्या आरोपांची दखल घेतली असून प्रकरणाचा सखोल तपास सुरू असल्याचे सांगितले आहे. आम्ही सर्व कुटुंबीयांची चौकशी करत आहोत. मिळालेल्या माहिती आणि पुराव्यांच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला असून पतीला ताब्यात घेण्यात आले आहे, असे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com