Shocking : भयंकर! बायको-पोरांसह ६ जणांची हत्या, आरोपीनं अख्ख्या कुटुंबाला संपवलं, धक्कादायक कारण आले समोर

Telangana Crime News : तेलंगणात पॉक्सो प्रकरणात जामिनावर सुटलेल्या आरोपीने ६ जणांची हत्या केली आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे
TELANGANA HORROR: POCSO ACCUSED ON BAIL ALLEGEDLY KILLS SIX INCLUDING WIFE, CHILDREN AND MINOR GIRL
TELANGANA HORROR: POCSO ACCUSED ON BAIL ALLEGEDLY KILLS SIX INCLUDING WIFE, CHILDREN AND MINOR GIRLSaam Tv
Published On
Summary
  • तेलंगणातील दैवलगुडा गावात ६ जणांची हत्या

  • मृतांमध्ये आरोपीची पत्नी, दोन मुले, अल्पवयीन मुलगी आणि दोन महिलांचा समावेश

  • आरोपीला बेड्या

  • पोलीस तपास सुरु

तेलंगणामधून धक्कादायक घटना समोर आली आहे. पॉक्सो प्रकरणात जामिनावर बाहेर आलेल्या एका आरोपीने कुटुंबातील ६ जणांची हत्या केली आहे. मृतांमध्ये त्याची पत्नी, दोन लहान मुले, एक अल्पवयीन मुलगी आणि पीडित कुटुंबातील दोन महिलांचा समावेश आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच पुढील तपास सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना तेलंगणातील दैवलगुडा गावात घडली आहे. आरोपीचे नाव राजकुमार असून त्याला पत्नी आणि २ मुलं असा परिवार होता. राजकुमारवर मे महिन्यात एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. पीडित मुलीच्या आईने १६ मे रोजी तक्रार नोंदवली होती. त्यानंतर पोलिसांनी २६ मे रोजी राजकुमारला अटक केली होती. काही काळ न्यायालयीन कोठडीत राहिल्यानंतर तो नुकताच जामिनावर बाहेर आला होता.

TELANGANA HORROR: POCSO ACCUSED ON BAIL ALLEGEDLY KILLS SIX INCLUDING WIFE, CHILDREN AND MINOR GIRL
Snake : पावसाळ्यात सापांना 'ही' ६ झाडे आवडतात, कारण वाचून येईल चक्कर

पोलिसांचा असा संशय आहे की, पॉक्सो अंतर्गत तक्रार दाखल केल्याचा त्याच्या पोटात राग खदखदत होता. या रागातून राजकुमारने स्वतःच्या कुटुंबातील पत्नी आणि २ मुलांची हत्या केली. तसेच पीडित मुलीच्या कुटुंबातील २ महिलांसह अल्पवयीन मुलीची हत्या केली. या दोन्ही वेगवेगळ्या ठिकाणी घडल्याचे पोलिसांनी सांगितले.

TELANGANA HORROR: POCSO ACCUSED ON BAIL ALLEGEDLY KILLS SIX INCLUDING WIFE, CHILDREN AND MINOR GIRL
Monsoon Tips : पावसाळ्यात घरात पालींचा वावर वाढला? 'हे' उपाय वेळीच करा नाही तर...

घटनेची माहिती मिळताच पोलिसांची पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली.आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. पोलीस आयुक्त तरुण जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून, हत्यांचा नेमका घटनाक्रम, त्यामागील हेतू आणि इतर संभाव्य कारणांचा शोध घेतला जात आहे. या घटनेने तेलंगणा हादरले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com