राजधानी हादरली! दिवसाढवळ्या महिलेची गोळ्या झाडून हत्या; ३ वर्षांपूर्वी झाला होता पतीचा खून

Woman Shot Dead In Shalimar Bagh Delhi: दिल्लीच्या शालीमार बाग परिसरात दिवसाढवळ्या एका महिलेची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. पतीच्या हत्येप्रकरणात मुख्य साक्षीदार असलेल्या रचना यादव यांच्या हत्येने राजधानी हादरली आहे.
Police investigate the crime scene after a woman was shot dead in broad daylight in Delhi’s Shalimar Bagh.
Police investigate the crime scene after a woman was shot dead in broad daylight in Delhi’s Shalimar Bagh.saam tv
Published On

दिल्लीच्या शालीमार बाग परिसरात दिवसाढवळ्या एका महिलेची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत महिलेची ओळख रचना यादव अशी आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Police investigate the crime scene after a woman was shot dead in broad daylight in Delhi’s Shalimar Bagh.
Crime News: आधी बुरखाधारी महिलेनं थांबवलं, नंतर नमाज वाचण्यासाठी जबरदस्ती अन्...; पालघरमधील महाविद्यालयात नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, रचना यादव या त्यांच्या पतीच्या तीन वर्षांपूर्वी झालेल्या हत्येप्रकरणी न्याय मिळवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात कायदेशीर लढा लढत होत्या. पतीची हत्या प्रॉपर्टी वादातून झाल्याचे समोर आले होते आणि त्या प्रकरणातील रचना यादव या मुख्य साक्षीदार होत्या.

Police investigate the crime scene after a woman was shot dead in broad daylight in Delhi’s Shalimar Bagh.
महाराष्ट्र हादरला! नवऱ्याने आधी बायकोला दगडाने ठेचून मारलं, त्यानंतर विष प्यायला; ४ निरागस मुले पोरकी

दिवसाढवळ्या अज्ञात गुंडांनी रचना यादव यांच्यावर गोळीबार केला आणि घटनास्थळावरून फरार झाले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून आरोपींचा शोध सुरू आहे.

Police investigate the crime scene after a woman was shot dead in broad daylight in Delhi’s Shalimar Bagh.
Shocking : "तुला पाळी आली असेल तर पुरावा दाखव", शिक्षिकेची अपमानास्पद वागणूक, विद्यार्थिनीचा मृत्यू; सरकारी कॉलेजमधील धक्कादायक प्रकार

पतीच्या हत्येशी संबंधित असण्याची शक्यता

पोलिसांच्या माहितीनुसार, रचना यादव यांच्या पतीची तीन वर्षांपूर्वी प्रॉपर्टी वादातून गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्या प्रकरणातील काही आरोपी अद्याप फरार आहेत. त्यामुळे ही हत्या त्याच जुन्या वादातून, तसेच रचना यादव या मुख्य साक्षीदार असल्यानेच करण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिस रेकॉर्डनुसार, बिजेंद्र यादव हा परिसरातील घोषित गुन्हेगार असून त्याच्यावर हत्या, जबरदस्तीने ताबा मिळवणे यासह अनेक गंभीर गुन्हे दाखल होते. पोलिस या संपूर्ण प्रकरणाकडे आपसी रंजिश आणि प्रॉपर्टी वादाच्या दृष्टिकोनातून तपास करत आहेत.

कुटुंबावर दु:खाचा डोंगर

रचना यादव यांच्या मृत्यूनंतर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या दोन मुली आहेत. एकीचे लग्न झाले असून दुसरी मुलगी शाळेत शिक्षण घेत आहे. आधी वडिलांची आणि आता आईची हत्या झाल्याने दोन्ही मुलींची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपास अधिक वेगाने सुरू केला असून फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com